एकदम कडक चहा प्या व फ्रेश व्हा
सकाळ झाली की आपल्याला चहा हे पेय हवेच त्याशिवाय आपला दिवस कसा सुरू होणार तसेच आपल्याला काम करायला उत्साह कसा वाटणार. भारतात आपल्याला अगदी गल्ली बोळात चहाची दुकाने किंवा ट्पर्या दिसतात. पार्टी असो वा प्रवास आपल्याला चहा हा हवाच. थंडी असो किंवा उन्हाळा असो आपल्याला सकाळी एक कप कडक चहा हा हवाच. कारण की फक्त चहा मध्ये ताजेतवाने व्हायचे गुणधर्म आहेत. चहा बनवतांना नेहमी ताजे पाणी व दूध वापरा.
दोन मिनिटात एकदम कडक चहा बनवायला अगदी सोपा आहे. एकदा पिऊनतर बघा कसे ताजे तवाने वाटते.
कडक चहा बनवताना आले किंवा गवती चहा घाला किंवा चहा मसाला पण घालू शकता. अश्या प्रकारचा कडक चहा सर्दी खोकला झाला असेल तेव्हा गरम गरम प्या फायदेशीर होईल. आल किंवा गवती चहा घालून चहा घशाला चांगला शेक बसतो.
बनवण्यासाठी वेळ: 2 मिनिट
वाढणी: 2 जणासाठी
साहीत्य:
1 कप पाणी
3/4 कप दूध
4 चमचे साखर
4 चमचे चहा पावडर
1/2” आले तुकडा (ठेचून किवा किसून)
कृती: एका स्टीलच्या पातेल्यात पाणी, साखर, चहा व आले (ठेचून किंवा किसून) पावडर घालून उकळी आली की मग त्यामध्ये दूध घालून उकळी आणा. उकळी आली की 30 -40 सेकंद चहा झाकून ठेवा म्हणजे चहा छान मुरेल. चहा मुरला की गाळून गरम गरम सर्व्ह करा.
The Marathi language videos of these special Puneri Tea recipes can be seen on our YouTube Channel.
घरी बनवा पुण्याचा लोकप्रिय स्वादीस्ट अमृततुल्य मसाला चहा रेसिपी
गरमागरम लेमन मसाला टी रेसिपी इन मराठी
गरमागरम पुण्याचा अमृततुल्य चहा रेसिपी