लिंबाचे 10 गुणधर्म किंवा फायदे जाणून घ्या
लिंबू हे फळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. लिंबू हे गुणकारी असून त्याच्या सेवनाने आपल्याला अनेक फायदे होतात. लिंबाच्या सेवनाने शरीरातील रक्त शुद्धी होते. पचन शक्ति चांगली होते.शरीरातील उष्णता कमी होते. संसर्गजन्य रोग होत नाहीत. सर्दी नाहीशी होते.
त्रिदोष, अग्नि, क्षय, वायु विकार, विष, मलाविरोध, व कॉलरामध्ये लिंबू खूप गुणकारी आहे. कृमी दूर करण्याचे गुण लिंबामध्ये आहे. रक्त दोष व त्वचारोगमध्ये ही लिंबू गुणकारी आहे. लिंबामध्ये विटामीन “C” भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे रोग प्र्तिकार शक्ती वाढते.
लिंबामुळे आपली शरीराची कांती सुधारते, त्वचा चांगली होते व केस चमकदार होतात.
1) लिंबू हे गुणकारी आहे. लिंबू स्वादाने आंबट असूनही बहुगुणी व उपयोगी फळ आहे. लिंबाचा रस हा रुचकर व पाचक असल्यामुळे आमटीत, भाजीत व भातावर ते पिळून घेतात. लिंबाच्या रसाने भोजन स्वादिष्ट लागते. लिंबू हे बहुगुणी असल्या मुळे त्याचे स्थान अनन्य साधारण आहे.
2) शरीराचे आरोग्य रक्ताच्या शुद्धतेवर अवलंबून असते. ते पाचक रसांना उत्तेजित करते. पचन क्रीयेमध्ये मदत करते. उन्हाळ्यात लिंबाचे सरबत करून पिले जाते. रक्तातील आंबट पणा लिंबाच्या सेवनाने दूर करण्याचे गुण लिंबामध्ये आहे.
3) लिंबाचे आपण लोणचे बनवतो ते खूप रुचकर लागते. तसेच लिंबा पासून सरबत किंवा स्क्वॉश बनवतात. जेवण झाल्यावर लिंबू पाणी घेतलेतर अन्न पचन चांगले होते.
4) त्रिदोष, अग्नि, क्षय, वायु विकार, विष, मलाविरोध, व कॉलरामध्ये लिंबू खूप गुणकारी आहे. कृमी दूर करण्याचे गुण लिंबामध्ये आहे. रक्त दोष व त्वचारोगमध्ये ही लिंबू गुणकारी आहे. लिंबामध्ये विटामीन “C” भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे रोग प्र्तिकार शक्ती वाढते.
5) लिंबाचा रस प्रतेक स्त्री पुरुषांनी व मुलांनी सेवन करावा. त्यामुळे संसर्गजन्य रोग होत नाहीत. लिंबाचा रस अनोश्या पोटी घेणे हितावाह आहे. लिंबाच्या सरबताने शरीरातील उष्णता कमी होते व थंड वाटते. उन्हातून आल्यावर ग्लासभर लिंबू सरबत घेतल्यास थकवा कमी होतो.
6) रात्री झोपताना गरम पाण्यात लिंबू पिळून प्याल्याने सर्दी नाहीशी होते. लिंबाचा रस व मिरेपावडर घालून त्याचे सेवन केल्याने यकृताचे रोग बरे होतात. लिंबाच्या रसात मध घालून त्याचे चाटण खाल्याने खोकला बारा होतो.
7) आपल्या अंघोळीच्या एक बादली पाण्यामध्ये लिबू रस घालून आंघोळ केल्यास आपली त्वचा मुलायम राहते व चमकदार होते.
8) थंडीच्या दिवसात लिंबू रस, गुलाब पाणी व ग्लीसरीन घालून मिश्रण बनवून आपल्या हाता पायांना लावल्यास त्वचा मुलायम राहते.
9) लिंबाचा रस व खोबरेल तेल सम प्रमाणात घेवून शरीरावर लावल्यास त्वचेची शुष्क्ता व नायटा बरा होतो व त्वचा निरोगी राहते.
10) लिंबाचा रस काढल्यावर त्याची साले टाकून न देता ती कुकर लावताना घालावी आतून कुकर छान स्वच्छ होतो. तसेच लिंबाच्या सालांनी लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई छान स्वच्छ निघून पांढरी दिसते.
The Marathi language video of this article can be seen here – 10 Important Medicinal and other Benefits of Lime