मकर संक्रांत साठी स्पेशल महाराष्ट्रियन पद्धतीने भोगीची भाजी
जानेवारी महिना आला की वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय. महाराष्टात मकर संक्रांत हा सण महिला खूप उत्साहाने साजरा करतात.
मकर संक्रांतच्या आदल्या दिवशी भोगी असते. ह्या दिवशी इन्द्र देवाची पूजा करून प्रार्थना केली जाते की आपल्या धर्तीवर उदंड पीक येवू देत. म्हणून ह्या दिवशी सर्व भाज्या मिळून त्याची भाजी बनवली जाते. तसेच भोगीच्या दिवशी एक छोटीशी होळी सुद्धा पेटवली जाते. ह्या सर्व भाज्या घालून जी भाजी बनवली जाते ती भाजी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. मकरसंक्रांत ह्या दिवशी पोंगल हा सण सुद्धा असतो.
साहीत्य:
पाव किलो प्रतेकी वांगी, गाजर, वालपापडी
2 शेवगा शेगा, 1 बटाटा, 1 वाटी पावटा दाणे, 1वाटी मटार दाणे
1 मोठा कांदा (चिरून)
2 टी स्पून लाल मिरची पावडर
2 टी स्पून काळा मसाला
2 टे स्पून तीळ (भाजून) कुट
2 टे स्पून सुके खोबरे कीस भाजून कुट
2 टे स्पून चिंच कोळ
मीठ व गूळ चवीने
फोडणी करीता:
2 डाव तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1/2 टी स्पून हळद
6-7 लसूण (ठेचून)
कृती: प्रथम सर्व भाज्या धुवून घ्या. वांग्याचे देठ कापून मोठे तुकडे करावेत. गाजराचे साल काढून त्याचे तुकडे करावेत. वालपापडी सोलून चिरून घ्या. शेवगा शेगा सोलून चीतून घ्या. कांदा बारीक चिरावा.
जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे,लसूण, हिंग, हळद घालून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
कांदा परतून झालकी त्यामध्ये चीरलेल्या वांग्याच्या फोडी, गाजराचे तुकडे, चिरलेली वालपापडी, शेवगा, बटाटे, मटार, पावटा घालून मिक्स करावे. पातेल्यावर झाकण ठेवून झाकणात पाणी घालून वाफेवर भाजी शीजवावी.
भाजी वाफेवर शिजल्यावर त्यामध्ये तिलकूट, खोबर्याचा कूट, लाल मिरची पावडर, मीठ, गूळ, काळा मसाला व दोन कप पाणी घालून भाजी चांगली शीजू द्यावी.
गरम गरम भाजी तिळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावी.
The video of this Maharashtrian Bhaji recipe can be seen here – Special Bhogichi Bhaji for Makar Sankranti