सुंदर आकर्षक स्वस्त मस्त घरी मॅचिंग बांगड्या बनवा
घरच्या घरी सुंदर आकर्षक मॅचिंग रंगबिरंगी बांगड्या बनवता येतात. अश्या प्रकारच्या बांगड्या बनवायला सोप्या व झटपट होणार्या आहेत. आपण लग्न समारंभ किंवा पार्टीला सणावाराला नवीन भरीच्या साड्या किंवा ड्रेस घेतो त्याबरोबर आपण आर्टिफीशल जुवेलरी सुद्धा घेतो.
आपल्या साडीला किंवा ड्रेसला मॅचिंग बांगड्या आपण घरी बनवू या. बांगड्या बनवण्यासाठी प्लॅस्टिकच्या बांगड्या, सिल्क म्हणजेच रेशीमचा दोरा किंवा एम्ब्रोडरीचा दोरा, सोनेरी डोरा वापरला आहे. आपल्याला बाजारात असे रेशीम दोरे किंवा कॉटनचे एम्ब्रोडरीचचे दोरे सहज उपलब्ध होतात. एका एम्ब्रोडरीच्या लडी मध्ये दोन बांगड्या बनतात.
साहीत्य:
प्लॅस्टिक बांगड्या
रेशीम दोरे (कॉटन किंवा सिल्क )
सोनेरी दोरा
फेविकॉल (दोरा चिटकवण्यासाठी)
आपण बांगड्या बनवतांना प्रथम एम्ब्रोडरीचा दोरा एका कागदाची घडी बनवून त्यावर गुंडाळून घ्या म्हणजे बांगडी बनवताना दोर्याचा गुंता होणार नाही.
एक प्लॅस्टिकची बांगडी घ्या. आपल्याला ज्या साडीला किंवा ड्रेसला मॅचिंग बांगडी बनवायची आहे त्या रंगाचा दोरा सिल्कच किंवा कॉटनचा एम्ब्रोडरीचा दोरा घ्या. सिल्कच्या एम्ब्रोडरीचा दोरा वापरला तर बांगडीला छान चकाकी दिसते.
प्लॅस्टिकच्या बांगडीवर घट्ट रेशमी दोरा गुंडाळून घ्यायचा आहे. पूर्ण बांगडीला दोरा गुंडाळून घ्यायचा आहे आतील बांगडी दिसता कामा नये. पूर्ण बांगडीला दोरा गुंडाळून झालाकी शेवटी थोडासा फेविकॉल लावून दोरा चिटकवून घ्यायचा आहे.
आता आपण तयार झालेल्या रेशमी बांगडीवर सोनेरी दोर्यानी डीझाईन करायचे आहे. त्यासाठी आपण प्रथम 8-10 वेढे द्या मग थोडीसी जागा सोडून दोन वेढे द्या अश्या प्रकारे चार वेळा एकसारखे वेढे द्या. मग परत 8-10 वेळा वेढे द्या अश्या प्रकारे पूर्ण बांगडीवर डीझाईन तयार करा. शेवटी फेविकॉल लावून दोरा चिटकवून घ्यायचा आहे.
अश्या प्रकारे आपण वेगवेगळे सेट बनवू शकतो.
The video in Marathi of this simple procedure to make Bangles at home can be seen here – How to Make Attractive and Decorative Bangles