Muhurat, Haldi Kumkum, Bornahan Makar Sankranti 2020 in Marathi

Information on Makar Sankranti 2020
Information on Makar Sankranti

मकर संक्रांत ह्या सणाची माहीती, मुहूर्त, नवी नवरीचे हळदी कुंकु कसे करायचे लहान मुलांचे बोरन्हाण कसे करायचे.

महाराष्ट्रात मकर संक्रांत हा महिलांचा मोठा सण आहे. धनू राशीतून मकर राशि मध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांति असते. 14 जानेवारी ह्या दिवशी भोगी आहे. 15 जानेवारी ह्या दिवशी मकर संक्रांत आहे.16 जानेवारी ह्या दिवशी किंक्रांत आहे. मकर संक्रांत मुहूर्त, महा पुण्य काल, महत्वाचा काल दिला आहे. बोळक्यांची (सुगड) पूजा साहित्य व पुजा कशी करायची. नवी नवरी हळदी कुकु कसे करायचे व लहान मुलांचे बोरन्हाण कसे करायचे दिले आहे.

नवीन वर्षातील मकर संक्रांत हा सण पहिला सण आहे. मकर संक्रांती दर वर्षी 14 जानेवारी ह्या दिवशी येते पण ह्या वर्षी 15 जानेवारी 2020 बुधवार ह्या दिवशी येते आहे. मकर संक्रांती ह्या दिवशी सूर्य एका राशी मधून दुसर्‍या राशि मध्ये जातो. म्हणजेच धनू राशीतून मकर राशि मध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांति असते. दर महिन्यामध्ये संक्रांति म्हणजेच पूर्ण वर्षात 12 संक्रांति येतात पण मकर संक्रांति ह्या दिवसाला जास्त महत्व आहे. ह्या दिवशी सूर्यदेव भगवान उत्तरायण होते. म्हणजेच दिवस मोठा व रात्र लहान व्हायला लागते. ह्या दिवशी सूर्य देवाची उपासना करतात. शास्त्रा नुसार दक्षिणायन नकारात्मक व उत्तरायण सकारात्मकतेच प्रतीक आहे. म्हणूनच ह्या दिवशी दान धर्म केले जाते.

14 जानेवारी ह्या दिवशी भोगी आहे त्या दिवशी मिश्र भाजी , तिळाची भाकरी व खिचडी बनवतात.
15 जानेवारी ह्या दिवशी मकर संक्रांत आहे.ह्या दिवशी तीळचे गोड पदार्थ बनवतात व तीळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतात.
16 जानेवारी ह्या दिवशी किंक्रांत आहे. म्हणजेच करी दिन आहे. ह्या दिवशी सांगले कोणते काम करीत नाही.

14 तारखेला संक्रांत गर्दभ ह्या वाहनावर सवार होउन गुलाबी वस्त्र घालून मिठाई खात येत असून दक्षिण से पश्चिम दिशेला जाणार असून 15 तारखेला उप वाहन मेष आहे.

मकर संक्रांत हा सण प्र्तेक राज्यात वेगवेगळ्या नावांनी साजरा करतात. महाराष्ट्रात मकर संक्रांत, दक्षिण भागात पोंगल तर पंजाब मध्ये लोहडी ह्या नावाने साजरा करतात. ह्या दिवशी रात्री होळी पेटवून गाणी म्हणतात. दक्षिण भागात पोंगल ह्या दिवशी गोठ्यातील गाईची पुजा करतात. गुजरातमध्ये ह्या दिवशी सर्वजण पतंग उडवतात.

Information on Makar Sankranti 2020
Information on Makar Sankranti

मकर संक्रांत मुहूर्त : सकाळी 6:41 मिनिट ते संध्याकाळी 6:22 मिनिट
महा पुण्य काल : सकाळी 6:41 मिनिट ते 8:38 मिनिट ह्या वेळात स्नान करून दान करावे.
महत्वाचा काल: सकाळी 7:05 मिनिट ते 12: 25 मिनिट स्नान करून दान करावे.

महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण महिला खूप उत्साहाने साजरा करतात. प्र्तेक घरातील महिला आपले घर स्वच्छ करून आवरून सजवून घेतात. ह्या दिवशी महिला छान आवरून घरात देवाची यथासांग पुजा करतात. पुजा झाल्यावर 5 बोळक्यांची पुजा केली जाते. व ती पूजा केलेली बोळकी (सुगड) संवाष्ण महिलेला वाण म्हणून दिले जाते.

बोळक्यांची (सुगड) पूजा कशी करायची
साहीत्य:
चौरंग व त्यावर स्वच्छ कापड
नवीन कापड बोळक्यांना झाकायला
पूजेचे सामान व फुले
5 मातीची बोकळी
1 पणती
दोरा बोळक्यांना गुंडाळण्यासाठी

बोळक्यांनमध्ये भरण्या साठी:
1 छोटे गाजर (चिरून)
10-15 पावटा शेगा
10-12 ताजी बोरे
1 छोटा उस तुकडे करून
5 भाताच्या ओंब्या
तीळ गूळ
नवीन कापड बोळक्यांना झाकायला

पुजा विधी:

प्रथम एका चौरंगवर नवीन कापड घालून त्यावर पाच बोळकी ठेवावी. प्रत्येक बोळक्याच्या तोंडाला दोरा गुंडाळावा व बाजूनी हळद कुंकु लावून प्रत्येक बोळक्यामध्ये गाजराचे तुकडे, पावटा शेगा, बोरे, ऊस तुकडे भाताच्या ओंब्या व तीळ गूळ घालावे. मग एका बोळक्यावर पणती ठेवून त्यावर फूल ठेवावे वरतून कापड घालावे.
मग पुजा करून प्रार्थना करावी की आमचा संसार सुखाचा होवो कोणाची सुद्धा नजर न लागो.

पुजा केल्यावर महिला देवळात जावून दुसर्‍या संवाष्ण महिलेला वाण देतात. संध्याकाळी घरी संवाष्ण महिलांना हळद कुंकू साठी बोलवतात. हळद कुंकू हे रथसपत्मी पर्यन्त करतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र घालतात त्यामुळे आपल्याला कोणाची नजर लागत नाही किंवा कोणत्यापण नकारात्मक शक्तीचा परीणाम आपल्यावर होत नाही.

नवी नवरी हळदी कुकु:

मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुलीचे हळदी कुकु करतात तीला हलव्याचे दागीने घालून तेचे कौतुक करतात पहीले हळदी कुकु करतात. काळ्या रंगाची साडी भेट देतात.

लहान मुलांचे बोरन्हाण:

लहान मुलांचे बोर नहाण करतात म्हणजे लहान मुलाला नवीन कपडे घालून हलव्याचे दागीने घालून अजून बाकीच्या लहान मुलांना बोलवतात.

एका मोठ्या आकाराच्या भांड्यात चूरमुरे, साखर फुटाणे, गोळ्या, छोटी बिस्किटे, चॉक्लेट, ऊस, बोरे, हरभरे, मिक्स करून ज्याचे बोरन्हाण करायचे आहे त्याच्या डोक्यावर हळूहळू अभिषेक करतात. व हा सगळा खाऊ लहान मुलांना वाटतात. बोरन्हाण हे 5 वर्षा वयाच्या मुलांचे करतता.

तीळचे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, वड्या, गजक, रेवडी, गुळाची पोळी व तिळाची चटणी ह्या आगोदरच्या विडियोमध्ये प्र्काशीत केले आहे.

The Marathi language video of information on Makar Sankranti can be seen here  – Muhurat, Puja-Vidhi, Haldi Kumkum, Bornahan Makar Sankranti 2020 in Marathi

Articles on Makar Sankranti

Important information about Makar Sankranti

Recipes and Puja-Vidhi for Makar Sankranti

Published
Categorized as Tutorials

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.