पुण्याची लोकप्रिय मधुर स्ट्रॉबेरी मस्तानी रेसिपी
जानेवारी महिना आला की स्ट्रॉबेरीचा सीझन चालू होतो. लाल लाल रंगाची रसरशीत मस्त स्ट्रॉबेरी डोळ्या समोर आली की खावीशी वाटते.
स्ट्रॉबेरी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. स्ट्रॉबेरीमध्ये विटामिन “सी” भरपूर प्रमाणात असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी हितावाह आहे तसेच त्यामध्ये एंटीऑक्सीडेंटतत्व आहेत. कॅन्सरशी लढण्याची शक्ति त्यामध्ये आहे. हार्टच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. ब्लडप्रेशरपण ठीक राहते.
मस्तानी म्हंटले की पुण्याची मस्तानी डोळ्या समोर येते. स्ट्रॉबेरी मस्तानीही खूप टेस्टी लागते. दिसायला सुद्धा आकर्षक दिसते. पुण्याची लोकप्रिय मधुर स्ट्रॉबेरी मस्तानी बनयायला अगदी सोपी आहे.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
थंड करण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य: (स्ट्रॉबेरी मिल्कशेक करिता)
1/2 लिटर दूध
2 टे स्पून साखर
8-10 ताज्या लाल स्ट्रॉबेरी (कापून)
सजावटी करिता:
4-5 ताज्या लाल स्ट्रॉबेरी (कापून)
4-5 बदाम (पातळ काप करून)
4-5 पिस्ते ( पातळ काप करून)
2 टे स्पून सब्जा बी (भिजवून – एछीक)
4 स्कूप स्ट्रॉबेरी आईस्क्रीम
कृती:
दूध गरम करून थंड करून घ्या. स्ट्रॉबेरीचे तुकडे करून घ्या, बदाम व पिस्ते तुकडे करून घ्या. स्ट्रॉबेरी मिल्कशेक करितामिक्सरच्या ब्लेंडरमध्ये थंड दूध (निम्मे), साखर, कापलेल्या ताज्या लाल स्ट्रॉबेरी किंवा 2 टे स्पून स्ट्रॉबेरी पल्प ब्लेंड करून घ्या. मग राहिलेले दूध घालून परत ब्लेंड करून घ्या.
4 डेकोरेटीव्ह ग्लास घेऊन त्यामध्ये स्ट्रॉबेरी मिल्कशेक ओतून त्यामध्ये थोडे स्ट्रॉबेरीचे पिसेस घालून वरतून एक आईस्क्रीम स्कूप घालून वरतून बदाम व पिस्ते काप घालून परत स्ट्रॉबेरीचे पिसेस घालून सजवा.
सर्व्ह करतांना थंड करून पुण्याची लोकप्रिय मधुर स्ट्रॉबेरी मस्तानी सर्व्ह करा.
The Marathi language video of this Mastani recipe can be seen here – Pune’s Delicious Strawberry Mastani