अगदी सोप्या किचन ट्रिक्स व टिप्स आपले रोजचे काम आसान करतात
आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही सोप्या ट्रिक्स व टिप्स मिळल्यातर आपले काम सोपे सहज व झटपट होते. ह्या विडियो मध्ये अशा काही सोप्या व झटपट ट्रिक्स दिल्या आहेत त्याचा उपयोग जे नवीन कूकिंग करायला शिकत आहेत किंवा ज्यांचे नवीन लग्न झाले आहेत व ते परदेशात राहात आहेत त्यांना अश्या प्रकारच्या ट्रिक्स व टिप्सचा चांगला उपयोग होईल.
अगदी सोप्या किचन ट्रिक्स व टिप्स आपले रोजचे काम आसान करतात ह्या वीडेओ मध्ये गव्हाच्या पीठाची कणीक कशी मळायची पोळ्या कश्या करायच्या वरण भात कुकर व डाळ कशी बनवायची. कांदा पोहेचे पोहे कसे भिजवावे. पाले भाज्या कश्या शीजवाव्या. मसाले भात मोकळा कसा करावा दूध व दही कसे राहील पुराण सैल झाले तर काय करावे टेस्टी चहा कसा करावा.
1) तांदूळ शिजण्या पूर्वी फक्त एकदाच धुवावा. अधिक वेळा धुतला तर त्यातील विटामिन “बी” नाहीसे होते. तसेच जर आपण भात कुकरमध्ये न लावता तसाच करणार असाल तर पाणी अगदी योग्य प्रमाणात घालावे. जास्त पाणी घातले तर भात ऊतू जावून भातातील विटामीन “बी” कमी होते.
2) मसाले भात तयार होत आलाकी- समजा अर्धा किलोचा भात असेल तर 1 टी स्पून ताक, 1 टी स्पून साखर व व 4 टी स्पून तूप एकत्र करून भाताच्या बाजूनी सोडावे म्हणजे मसाले भात छान मोकळा, चविस्ट व चकचकीत होतो.
3) पोळ्या साठी कणिक मळताना थोडे दूध वापरावे म्हणजे पोळ्या छान मऊ होतात तसेच कणिक मळून झाल्यावर तेलाचा हात लावून अर्धा तास तशीच झाकून ठेवा मग पोळ्या करा कणिक भिजल्या मुळे सुद्धा पोळ्या छान मऊ होतात.
4) पोळी भाजून झाली की तिला लगेच तूप लावावे म्हणजे छान खमंग लागते व मऊ राहते.
5) वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ शिजत ठेवतांना त्यामध्ये 1 टी स्पून गोडे तेल घालावे डाळ छान शिजून येते.
6) उन्हाळ्यात दूध लवकर खराब होते तेव्हा दुधात एक चिमुट मीठ घालावे म्हणजे दूध बराच काळ ताजे राहते.
7) दुधाचे विरजण लावताना तुरटी फिरवून विरजण लावल्यास विरजण अगदी घट्ट होते.
8) घरी लोणी काढल्यावर लगेच कढवायला वेळ नसेलतर त्यात थोडे मीठ टाकून ठेवल्यास लोण्याला अंबुस वास येत नाही.
9) चहा व कोकोत चिमुटभर मीठ घातल्यास त्याची चव जास्त मधुर लागते.
10) हिरव्या रंगाच्या पाले भाज्या उकडताना अथवा शिजवतना लवकर शिजावे अथवा त्याचा हिरवा रंग तसाच रहावा त्यासाठी भांड्यावर झाकण ठेवू नये झाकण न ठेवता उकडावे.
11) मुळा किसल्यावर त्याचे पाणी सुटत ते टाकून न देता ते पाणी तुरीच्या डाळीच्या आमटीत घालावे म्हणजे आमटील छान टेस्ट येते.
12) सफरचंद कापल्यावर लगेच काही वेळात काळे पडते त्यासाठी थोडेसे मीठ लावावे.
13) एखाद वेळी पुराण सैल झाले तर त्यामध्ये धुतलेल्या तांदळाचे 4 दाणे त्यात टाकल्यास पूरण आळून येते.
14) श्रीखंड शिल्लक राहील्यास त्यामध्ये थोडेसे दूध घालून ठेवावे म्हणजे ते आंबट होत नाही.
15) जेव्हा कोशंबीर बनवतांना दही वापरतो तेव्हा ती शिल्लक राहीली तर संध्याकाळ पर्यन्त ती फसफसून येते तर जेव्हा कोशिंबीर मध्ये दही घालायचे तेव्हा दही फडक्यात ठेवून त्याचे पाणी निघून गेल्यावर मग ते दही वापरावे.
The Marathi language video of this article can be seen here – Amazing Kitchen Tips and Tricks for New Homemakers