टेस्टी चिल्ड हॉट कॉफी लेमोनेड Chilled or Hot Lemonade Coffee
चिल्ड कॉफी लेमोनेड ही मस्त रीफ्रेशिंग कॉफी आहे. ह्या कॉफीची टेस्ट थोडी कडवट व आंबटगोड अशी लागते. चिल्ड कॉफी लेमोनेड मध्ये दुधाचा वापर केलेला नाही. वेट लॉस रेसिपी आहे. ह्यामुळे झटपट वजन कमी होते व तसेच रोग प्र्तिकार शक्ति सुद्धा वाढते.
उन्हाळा आला की आपल्याला चांगले थंड पेय घ्यावेशे वाटते. परत ते पेय हेल्दि सुद्धा पाहीजे. चिल्ड कॉफी लेमोनेड हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. लेमन लिंबू ह्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने थंड आहे. तसेच त्यामध्ये विटामीन “C” भरपूर असते.
लेमोनेड कॉफी बनवायला अगदी सोपी आहे. व झटपट होणारी आहे. लेमन कॉफी थंड किंवा गरम सुद्धा करता येते. अश्या प्रकारच्या कॉफीचा एक सिपजरी घेतला तरी मस्त वाटते.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 2 जणासाठी
साहीत्य:
2 कप चिल्ड तयार कॉफी (ब्रू)
2 टे स्पून लेमन ज्यूस (अथवा जुरूरी प्रमाणे)
1 कप आईस क्युब
4 टे स्पून साखर
सजावटीसाठी:
लेमन स्लाईस
पुदिना पाने
कृती:
प्रथम ब्रू कॉफी तयार करून थंड करून घ्या. (म्हणजे 2कप पाणी व 2 टी स्पून कॉफी पावडर घालून उकळून घेवून थंड करून घ्या. )
मग त्यामध्ये लेमन ज्यूस व साखर घालून चांगले मिस्क करून घ्या. तयार झालेले मिश्रण दोन डेकोरेटीव्ह काचेच्या ग्लासमध्ये ओतून त्यामध्ये निम्मा बर्फ घाला व लेमनच्या गोल स्लाईस घालून वरतून पुदिना पाने घालून सजवून थंड थंड सर्व्ह करा.
जर शरीराचे वजन वाढले असेल तर रोज सकाळी गरम गरम लेमन ब्लॅक कॉफी घेतले तर शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
The video of the same Coffee recipe in Marathi can be seen here – Tasty Chilled or Hot Lemonade Coffee for Weight Loss