बीना अंड्याचा चॉको लावा केक इडली स्टँड मध्ये
चॉको लावा केक म्हंटले की आपल्या सागळ्यांना आवडतो. लावा केक खाताना त्यामधून चॉको लावा बाहेर येतो त्यामुळे त्याची टेस्ट अगदी अनोखी लागते. चॉको लावा केक बनवताना त्यामध्ये चॉकलेट भरून केले आहे.
चॉको लावा केक ह्याची एक खास बात आहे की अश्या प्रकारचा केक ओव्हन शिवाय बनवला आहे. तसेच कुकरमध्ये इडली स्टँड मध्ये बनवला आहे. त्यामुळे दिसायला अगदी आकर्षक देसतो.
चॉको लावा केक बनवायला अगदी सोपा आहे, मुलांना खूप आवडतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 12 बनतात
साहीत्य:
1 1/2 कप मैदा
1 कप पिठीसाखर
3 टे स्पून कोको पावडर
1 टी स्पून बेकिंग पावडर
1/2 टी स्पून बेकिंग सोडा
3 टे स्पून तेल
1 कप पाणी
1 टी स्पून लिंबूरस
1/2 टी स्पून वनीला एसेन्स
1/4 टी स्पून मीठ
1 टे स्पून तेल इडली स्टँडला लावायला
लावा बनवण्यासाठी:
50 ग्राम डार्क चॉकलेट
3 टे स्पून दूध (अगदी गरम)
कृती:
लावा बनवण्यासाठी: डार्क चॉकलेटचे बारीक तुकडे करून एका बाउल मध्ये घ्या मग त्यामध्ये हळू हळू गरम दूध घालून मिश्रण पातळ करून घेवून बाजूला ठेवा.
एका बाउल मध्ये चाळणी ठेवून मैदा, पिठी साखर, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व मीठ चाळून घ्या. मग त्यामध्ये तेल घालून मिक्स करून पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या. मिश्रण एव्हडे मिस्क झाले पाहिजे की वरतून टाकताना ते रिबिन सारखे पडले पाहिजे.
कुकरमध्ये गरम करायला ठेवा. कुकर गरम झालाकी त्यामध्ये मीठ घालून मंद विस्तवावर चांगला गरम होवू द्या. झाकणाची शिट्टी व रिंग काढून ठेवा. इडली स्टँडला तेलाचा हात लावून घ्या.
बनवलेल्या मिश्रणात वनीला एसेन्स व लिंबूरस घालून चांगले मिक्स करून घ्या.. मग इडली स्टँड मध्ये प्रतेक साचामध्ये 1 टे स्पून मिश्रण घाला. त्यावर मधोमध 1 टी स्पून लावा घाला परत वरतून 1 टे स्पून केकच्या मिश्रण घाला अश्या प्रकारे सर्व मिश्रण इडली स्टँडमध्ये भरून घ्या.
आता इडली स्टँड कुकरमध्ये ठेवून 15 मिनिट मंद विस्तवावर बेक करून घ्या. 15 मिनिट नंतर चेक करून बघा. केक बेक नसेल झाला तर अजून 5 मिनिट ठेवा. मग थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या.
चॉको लावा केक जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सर्व्ह करा.
The Marathi language video of this cake recipe can be seen here – How to make Egg-Less Choco-Lawa Cake in Idli Stand