रवा पासून बनवा जबरदस्त मिठाई
रवा किंवा सुजी किंवा सेमोलिना वापरुन आपण अनेक गोड किंवा तिखट पदार्थ बनवू शकतो. असाच एक अगदी मस्त मिठाईचा पदार्थ आहे चवीला एकदम मस्त आहे व झटपट होणारा अगदी निराळा अनोखा पदार्थ आहे. अश्या प्रकारची मिठाई आपण सणावाराला किंवा स्वीट डिश म्हणून किंवा नाश्त्याला सुद्धा बनवू शकतो. तसेच अगदी स्वस्त व मस्त आहे.
रवा किंवा सुजी किंवा सेमोलिना वापरुन मिठाई बनवतांना खवा मावा वापरला नाही.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 20 बनतात
साहीत्य:
पाक बनवण्यासाठी:
1 1/4 कप साखर
1 कप पाणी
1 टी स्पून वेलची पावडर
मिठाई बनवण्यासाठी:
1/2 कप रवा
1 कप दूध
2 टे स्पून मिल्क पावडर (एछीक)
1 टे स्पून साजूक तूप
1 टे स्पून काजू बदाम (जाडसर पावडर)
2 टी स्पून कॉर्नफ्लोर किंवा मैदा
1 चिमुट बेकिंग सोडा
तेल तळण्यासाठी
सजवटीसाठी पिस्ते तुकडे करून
कृती:
प्रथम एका कढईमध्ये साखर व पाणी घालून मध्यम विस्तवावर एक तारी पाक बनवून घ्या एमजी त्यामध्ये वेलचीपावडर घालून मिक्स करा व बाजूला झाकून ठेवा.
मिक्सरच्या भांड्यात रवा व मिल्क पावडर घेवून थोडे ग्राइंड करून घ्या. दुसर्या कढईमद्धे दूध गरम करायला ठेवा दूध गरम झालेकी की त्यामध्ये ग्राइंड केलेला रवा हळू हळू घाला व मिक्स करत जा, मिश्रण घट्ट व्हायला आले की विस्तव बंद करून मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेवून त्यामध्ये तूप घालून चांगले मळून घ्या. मग त्यामध्ये काजू बदाम पावडर घालून परत मळून घ्या नंतर त्यामध्ये मैदा किंवा कॉर्न फ्लोर घालून परत चांगले मळून घ्या. शेवटी 2 चिमुट बेकिंग सोडा घालून परत मळून घ्या. मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवून मध्ये थोडेसे दाबून सुरीने किंवा चमचानी क्रॉसचे डीझाईन करा.
कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाले की बनवलेले गोळे दोनी बाजूंनी तळून घ्या. सर्व गोळे तळून झाले की साखरेच्या पाकात 5-7 मिनिट ठेवा वरतून पिस्ता तुकडे घालून सजवा.
जेवण झाल्यावर किंवा नाश्त्याला सर्व्ह करा.
The Marathi language video of this Rawa / Suji Mithai can be seen here – Delicious Homemade Suji Mithai