5 मिनिटात बनवा हॉटेल सारखी सोपी झटपट आईस कोल्ड कॉफी व कॉफी गुणधर्म
कॉफी हे पेय सर्वांना आवडते. त्यात कोल्ड कॉफी म्हंटले की छान थंडगार अगदी झाकवाली कॉफी डोळ्या समोर येते मग आपण अश्या प्रकारची कॉफी कधी संपवतो असे होते. कोल्ड कॉफी बनवायला अगदी सोपी आहे तसेच झटपट होणारी आहे.
उन्हाळा आला की दुपारी किंवा रात्री कोल्ड कॉफी घेतली की अगदी छान फ्रेश वाटते तसेच डिप्रेशन दूर होते. कॉफी चा एक महत्वाचा फायदा ती ब्रेस्ट कॅन्सर पासून रक्षण करते, लिव्हर चे आरोग्य चांगले ठेवते., एंटीऑक्सीडेंट आहे. ज्यांना डायबीटीस आहे त्यांना लाभदायक आहे.
कॉफी हे असे पेय आहे की त्याच्या सेवनाने मेंदूला थकवा आला तर तो दूर करण्यासाठी व ताजेतवाने होण्यासाठी कॉफीचे सेवन केले जाते. कॉफी ही अरब लोंकांकडून भारतात आली आहे. कॉफी मध्ये नेसकॅफे ही उत्तम आहे. कॉफीच्या सेवनाने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते व स्फूर्ती येते. कॉफी मुळे आळस दूर होतो व ज्ञान तंतुना उतेजन मिळते. कॉफी ही उष्ण असते.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 2 जणासाठी
साहीत्य:
1 टे स्पून इन्स्टंट कॉफी पावडर
1 1/2 कप दूध (क्रीम मिल्क)
1 टे स्पून साखर
5-6 आईस क्युब
सजावटीसाठी:
विप्प क्रीम, कॉफी पावडर
कृती:
प्रथम दूध गरम करून थंड करून घ्या. एका मिक्सरच्या जार मध्ये कॉफी पावडर, साखर, दूध व आईस क्युब घालून चांगले ब्लेण्ड करून घ्या. म्हणजे मिक्सर चालू करून लगेच 10 सेकंद मध्ये बंद करा असे 5-6 वेळा करा म्हणजे त्याला छान फेस येईल.
कॉफी ब्लेण्ड करून झाल्यावर एका छान डेकोरेटीव्ह ग्लास मध्ये ओतून वरतून विप्प क्रीमने व कॉफी पावडर ने सजवा. थंड गार आईस कोल्ड कॉफी सर्व्ह करा.
The video in Marathi of making this Ice Cold Coffee can be seen here – How to Make Parlour Style Iced Cold Coffee in 5 Minutes