मशिन शिवाय होम मेड कॅफे कैपुचीनो Cappuccino Coffee इटालियन स्टाइल कॉफ़ी
केपुचीनो (Cappuccino) ही एक इटालियन स्टाइल कॉफ़ी आहे. केपुचीनो छान टेस्टी लागते व ह्यामध्ये कॉफ़ी पाउडर, गरम दूध पाहेजे. व तसेच कॉफी वरील झाक दुधानीच बनवला जातो. केपुचीनो मार्केटमध्ये आज काल फार लोकप्रिय आहे.
आजकाल कॉफी सर्वांना आवडते. खर म्हणजे केपुचीनो एस्प्रेसो मशीन मध्ये बनवले जाते. पण आपणघरी मशीन शिवाय सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. तसेच स्वस्त व मस्त बनवा घरी पाहिजे तेव्हा. थंडी मध्ये आपण गरमा गरम कैपुचीनोचा अस्वाद घेऊ शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 2 जणासाठी
साहीत्य:
1 1/2 कप दूध
2 टी स्पून कॉफी पावडर
4 टी स्पून साखर
1 टी स्पून चॉकलेट सिरप
1/2 कप पाणी
1 टी स्पून चॉकलेट पावडर
1/2 टी स्पून चॉकलेट सिरप (सजावटी साठी)
कृती:
कैपुचीनो कॉफी बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात 1/2 कप पाणी व दूध घेवून मध्यम विस्तवावर गरम (उकळून) करून घ्या.
मग एका कॉफी मग मध्ये साखर व कॉफी पावडर घेवून 1 चमचा गरम पाणी घालून हैंड बीटर किंवा चमच्यानी एक सारखे बीट करून घ्या. चांगले फेटून घेतल्यावर फ्लफी होईल.
मग हे मिश्रण दोन कॉफी मग मध्ये एक सारखे ओतून घ्या. मग दूध व पाणी गरम केलेले त्या मग मध्ये हळू हळू थोडेसे उंचीवरून ओतत रहा व सारखे चमच्यानी हलवत रहा. जेव्हडे आपण चमच्यानी हलवत राहू तेव्हडी कॉफी फुलून वर येईल.
मग गरम गरम कॉफी वर चोकलेट सीरप व चॉकलेट पाउडर घालून सजवून सर्व्ह करा. आता आपले स्वादिष्ट इटालियन ड्रिंक कैपुचीनो तयार आहे.
The video in Marathi of this Cappuccino Coffee can be seen here – How to make Italian Style Cappuccino Coffee without Machine at Home