अगदी नवीन स्टाईल मध्ये ताज्या मटारचा चटपटा जबरदस्त नाश्ता
मटारचा सीझन आलाकी बाजारात छान ताजे ताजे मटार मिळतात मग आपण मटार वापरुन नानाविध रेसिपी बनवतो. मटार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे.
पाटवड्या हा पदार्थ महाराष्टात पारंपारीक व लोकप्रिय आहे. पाटवडी बनवतांना बेसन लाल मिरची पावडर व मीठ वापरतात. पण त्यामध्ये आपण मटार घालून बनवली तर मस्त टेस्टी लागते. तसेच शालो फ्राय करून किंवा डिप फ्राय करून त्याला अजून टेस्ट येते.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
3/4 कप बेसन, 1/4 कप तांदळाचे पीठ
2 1/2 कप पाणी, 1/4 कप हिरवे ताजे मटार
2 टे स्पून कोथबीर (चिरून)
1 छोटा कांदा (बारीक चिरून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद, 1/4 टी स्पून हिंग
1 टी स्पून चाट मसाला, मीठ चवीने
तेल फ्राय करण्यासाठी
फोडणी करीता:
2 टे स्पून तेल
1/4 टी स्पून हिंग
कृती:
ताजे हिरवे मटार मिक्सरमध्ये जाड सर वाटून घ्या. कांदा व कोथबिर बारीक चिरून घ्या. एका बाउलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, वाटलेले मटार, कोथबिर, कांदा, लाल मिरची पावडर, हळद, हिंग चाट मसाला, मीठ व पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या.
एका कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये हिंग घालून बेसनचे मिश्रण घालून चांगले मिक्स करून घ्या एमजी घट्ट होई पर्यन्त शीजवून घ्या.
एका स्टीलच्या प्लेटला तेल लावून त्यामध्ये बनवलेले मिश्रण घालून एक सारखे थापून घ्या. थंड झाल्यावर वड्या कापून घ्या.
तवा गरम करून त्याला तेल लावून त्यावर कापलेल्या वड्या ठेवा व दोनी बाजूंनी छान कुरकुरीत शालो फ्राय करा.
गरम गरम मटारच्या वड्या सर्व्ह करा.
The Marathi language video of this Green Peas Breakfast Recipe can be seen here – New Style Fresh Green Pees Nashta