महाशिवरात्री 2020 माहीती मुहूर्त पुजा मंत्र कहाणी व महाशिवरात्री स्पेशल थंडाई
महाशिवरात्री 2020 हिंदू पंचांग नुसार महाशिवरात्री हा दिवस अगदी खास मानला जातो. त्या दिवशी शिवभक्त श्री शंकर भगवान यांची पुजा करून पूर्ण दिवस उपवास करतात. ह्या वर्षी महाशिवरात्री 21, फेब्रुवारी 2020 शुक्रवार ह्या दिवशी येत आहे. खर म्हणजे महाशिवरात्री ह्या दिवशी शिव व शक्ति यांचे मिलनाची रात्र आहे. धार्मिक शिव भक्त असे म्हणतात की ह्या रात्री आध्यात्मिक शक्ति जागरूक होते. तसेच शास्त्रामध्ये असे म्हणतात की ह्या दिवशी ज्योतिष उपाय केले की आपल्या सगळ्या पीडा, दुख व क्लेश नाहीसे होतात.
देवांचे देव श्री भगवान श्री शंकर भोलेनाथ ह्यांचे भक्त महाशिवरात्री हा दिवस श्रद्धेने पुजा, अर्चा उपवास करून साजरा करतात. ह्या दिवशी उपवास केल्यास असे म्हणतात की श्री भगवान शंकर भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात. व आपली मनोकामना लवकर साकार होते. आपली सर्व पापे धुतली जातात असे म्हणतात.
महाशिवरात्री 2020 स्पेशल थंडई चे साहीत्य व थंडाई कशी बनवायची हे स्टेप स्टेप दिले आहे.
महाशिवरात्री पुजा मुहूर्त:
महाशिवरात्री 21 फेबुवारी शुक्रवार संध्याकाळी 5:20 मिनिट सुरू होवून
22 फेब्रुवारी शनिवार संध्याकाळी 7:02 मिनिट पर्यंत आहे.
रात्रीच्या वेळी पुजा वेळ:
पहिला प्रहर: 21/2/2020 संध्याकाळी 6:41 ते रात्री 12:52 मिनिट (22/2/2020)
दूसरा प्रहर : 21/2/2020 रात्री 9:46 ते रात्री 12:52 मिनिट (22/2/2020)
तिसरा प्रहर : 22/2/2020 रात्री 12:52 ते 3:58 मिनिट पहाटे (22/2/2020)
चौथा प्रहर : 22/2/2020 पहाटे 3:58 ते 7:03 मिनिट सकाळी (22/2/2020)
उपवास सोडणे वेळ: 7:03 ते 3:47 मिनिट (22/2/2020)
महाशिवरात्री पुजा महत्व:
महाशिवरात्री ह्या दिवशी श्री भगवान शंकर व देवी पार्वती यांचा शुभविवाह झाला होता.
महाशिवरात्री पुजाविधी:
महाशिवरात्री ह्या दिवशी पहाटे लवकर उठावे स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. कपाळावर थोडे भस्म लावावे व गळ्यात रूद्राक्षाची माळ घालून शिवालयात जावून विधी पूर्वक पुजा, अभिषेक व बेलपत्र वहावे तसेच मंत्र जाप करावा पूर्ण दिवस उपवास करून दुसर्या दिवशी श्री भगवान शंकर ह्यांना भोग दाखवून मग आपला उपवास सोडावा.
श्री शंकर भगवान ह्याची पुजा करण्यासाठी बेलपत्र, मध, दूध, दही, साखर, व गंगाजल ह्यांनी अभिषेक करावा. असे केल्याने आपल्या समस्या दूर होवून आपल्या इच्छा पूर्ण होतात,
महाशिवरात्री ह्या दिवशी पहिल्या प्रहरमध्ये पुजा करतता. तसेच प्रतेक प्रहरमध्ये मंत्र जाप करावा. जर आपल्याला शिवालयात जावून मंत्र जाप करणे शक्य नसेल तर घरीच शांत जागी बसून मनोभावे मंत्र जाप करावा. चारही प्रहरमध्ये मंत्र जाप केल्याने आपल्याला पुण्य मिळते..
महाशिवरात्रीसाठी करावयाचा मंत्र जाप
“ॐ नम: शिवाय” “शिवाय नम:
महाशिवरात्री व्रतकथा विडियो मध्ये सांगितली आहे. विडियो ची लिंक खाली दिलेली आहे.
महाशिवरात्री स्पेशल थंडाई:
महाशिवरात्री म्हणजे थंडाई तर हवीच ना. महाशिवरात्र ह्या दिवशी मुद्दामहून थंडाई बनवली जाते, कारण की ह्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करतात व दुसऱ्या दिवशी सोडतात.. थंडाईच्या सेवनाने आपले शरीर थंड राहते. व ते पौस्टिक सुद्धा आहे. भारतातील थंडाई हे पेय एक पारंपारिक पेय आहे.
साहित्य:
10-12 बदाम 10-12 काजू 25-30 मिरे 10-12 किसमिस 10-12 वेलची 1 टी स्पून खसखस
1 टी स्पून बडीशेप 1 टी स्पून खरबूस बी 3 कप दूध 1/4 कप साखर 1 चिमुट केशर (1 टे स्पून दुधात भिजून) 1/2 टी स्पून रोझ वॉटर
कृती:
1/2 कप दुधात बदाम, काजू, मिरे, किसमिस, वेलची, खसखस, बडीशेप व खरबूज बी 5 तास भिजवून ठेवा.
मग मिक्सरच्या भांड्यात बारीक पेस्ट करून घ्या. गरज वाटली तर थोडे दूध मिक्स करा. नंतर बाकीचे राहीलेले दूध मिक्स करा.
मिक्सर मधून बारीक केलेली पेस्ट गाळणीनी गळून घ्या. मग साखर, भिजवलेले केशर व रोझ वॉटर घालून साखर विरघळेस तोवर मिक्स करा.
थंडगार थंडई ग्लासमध्ये ओतून वरतून गुलाब पाकळ्या व ड्रायफ्रूटने सजवा.
The video of this article on the importance and story of Mahashivratri and the 2020 Muhurat Timings and recipe for making Special Thandai for Maha Shivratri can be seen here – Story and Puja Vidhi for Mahashivratri 2020