आप्पे पात्रमध्ये झटपट10 मिनिटात मिनीबोरबॉन चोको लावा केक
केक म्हंटले की सर्वांना म्हणजे लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडतो. केक समोर दिसला की तोंडला पाणी सुटते त्यात लावा केक म्हंटले की तर अगदी पाहता क्षणी खावसा वाटतो.
बोरबॉन चोको लावा केक बनवायला अगदी सोपा आहे. अश्या प्रकारचा केके बनवतांना ओव्हन किंवा कुकरची गरज नाही. आपल्या सर्वांकडे आप्पे पात्र असते त्यामध्ये 10 मिनिट मध्ये आपण अश्या प्रकारचा चोको लावा केक बनवू शकतो.
बोरबॉन चोको लावा केक बनवण्यासाठी बोरबॉन बिस्किट वापरले आहे. लावा बनवण्यासाठी चॉकलेट वापरले आहे. चोको लावा केक आपण नाश्त्याला किंवा जेवण झाल्यावर स्वीट डिश किंवा डेझर्ट म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकता.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
तयारी करण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 7 केक बनतात
साहित्य: लावा बनवायण्यासाठी:
50 ग्राम चॉकलेट डार्क कंपाऊंड (किसून)
2 टे स्पून दूध (अगदी गरम)
केक बनवण्यासाठी:
12 बोरबॉन बिस्किट
1/2 वाटी दूध (नॉर्मल)
1 टे स्पून तेल आप्पे पात्रला लावायला
कृती:
लावा बनवण्यासाठी: प्रथम एका छोट्या बाउलमध्ये किसलेले किंवा बारीक तुकडे करून चॉकलेट डार्क कंपाऊंड घ्या त्यामध्ये अगदी गरम दूध हळू हळू घालून चांगले मिक्स करा. मिश्रण पातळ झाले की मग फ्रीजर मध्ये 10 मिनिट ठेवा.
बोरबॉन बिस्किटचे तुकडे करून घ्या मग मिक्सरमध्ये ग्राइंड करून पावडर करून घ्या. मग ए का बाउल मध्ये पावडर काढून घेवून त्यामध्ये थोडे थोडे दूध घालून चांगले मिश्रण बनवून घ्या. ते असे फेटून घ्याकी आपण वरतून खाली टाकताना ते रिबिन सारखे पडले पाहिजे.
आप्पे पात्राला तेल लावून घ्या. मग एक एक टे स्पून मिश्रण आप्पे पात्रामध्ये घालून वरतून एक टी स्पून लावा मधोमध घाला त्यावर परत 1 टे स्पून मिश्रण घालून घ्या. अश्या प्रकारे आप्पे पात्रात मिश्रण घालून घ्या.
मंद विस्तवावर आप्पे पात्र ठेवून त्यावर झाकण ठेवा व अगोदर 7 मिनिट बेक करून घ्या. झाकण काढून चेक करा पाहिजे तर अजून 2-3 मिनिट बेक करून घ्या.
मिनी बोरबॉन चोको लावा केक एका प्लेटमध्ये काढून घेवून सर्व्ह करा.
The Marathi language video of this cake recipe can be seen here – Homemade Mini Bourbon Choco Lava Cake In 10 Minutes Recipe in Marathi