10 मिनिटात झटपट कॉलिफ्लॉवरची (टिकाऊ) सिक्रेट मसाला वापरुन रेस्टोरंट सारखी भाजी रेसीपी
कॉलिफ्लॉवरची (टिकाऊ) सिक्रेट मसाला वापरुन रेस्टोरंट सारखी भाजी बनवायला अगदी सोपी व झटपट होते. सीक्रेट मसाला वापरला आहे तो बनवायला अगदी सोपा आहे व फ्रीजरमध्ये 4-5 दिवस अगदी छान राहतो. हा मसाला वापरुन आपण झटपट विवीध प्रकारच्या भाज्या बनवू शकतो. तसेच कडधान्ये वापरुन सुद्धा आमटी छान बनते. अंडा करी किंवा मटार बटाटा साठी हा मसाला अगदी परफेक्ट आहे.
कॉलिफ्लॉवर्ची भाजी मुले अगदी आवडीने खातात त्यांना डब्यासाठी पण छान आहे किंवा ऑफिसला जातांना घेवून जायला मस्त आहे. कॉलिफ्लॉवरची रस्सा भाजी चपाती, पराठा किंवा नान किंवा गरम गरम भाता बरोबर पण मस्त लागते.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
तयारीसाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
250 ग्राम कॉलिफ्लॉवर
1/2 कप ताजे मटार दाणे
1 मध्यम आकाराचा कांदा
1 छोटा टोमॅटो
1 वाटी सीक्रेट मसाला
1 टी स्पून गरम मसाला
1/4 कप कोथंबीर
मीठ चवीने
फोडणी करीता:
2 टे स्पून तेल
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
सीक्रेट मसाला करीता:
1 टे स्पून तेल, 1 कप ओला नारळ
1 छोटा कांदा (चीरून)
8 लसूण पाकळ्या, 1/2” आले तुकडा
1 टी स्पून लाल मिरची पावडर (तिखट)
(कढईमद्धे तेल गरम करून कांदा, आले, लसूण थडे परतून घ्या. मग त्यामध्ये ओला खोवलेला नारळ घालून थोडे गुलाबी रंगावर परतून घ्या. लाल मिरची पावडर घालून चांगले मिक्स करून थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटलेला मसाला स्टीलच्या डब्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवा पाहिजे तेव्हा काढून वापरा. अश्या प्रकारचा मसाला 4-5 दिवस चांगला राहतो. सीक्रेट मसाला वापरुन आपण भाज्या, आमटी, उसळी अंडा करी अगदी 10 मिनिटात झटपट बनवू शकतो. )
कृती:
प्रथम कॉलिफ्लॉवर धुवून त्याचे छोटे छोटे तुरे तोडून घ्या. कांदा, टोमॅटो व कोथबीर चीरून घ्या. सीक्रेट मसाला बनवून घ्या.
एका कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये हिंग व कांदा घालून थोडा परतून घ्या. मग त्यामध्ये टोमॅटो घालून थोडा परतून घ्या. कॉलिफ्लॉवर, मटार, मीठ व हळद घालून मंद विस्तवावर झाकण ठेवून झाकणावर थोडे पाणी घालून 2-3 मिनिट भाजी वाफेवर शीजवून घ्या. एमजी झाकण काढून झाकणावरील गरम पाणी घालून 2 मिनिट भाजी शीजू ध्या.
आता सीक्रेट मसाला, गरम मसाला, घालून 1/2 वाटी पाणी घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवून 5 मिनिट मसाला व भाजी शीजू द्या. झाकण काढून चिरलेली कोथबीर घालून 2 मिनिट तशीच भाजी शिजवून घ्या. कॉलिफ्लॉवरची भाजी शिजल्यावर वॉरतून कोथबीरने सजवा.
गरम गरम कॉलिफ्लॉवरची भाजी चपाती, पराठा किंवा नान बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of this Maharashtrian Bhaji Recipe can be seen here – How to Make Restaurant Style Cauliflower Bhaji using Secret Masala in 10 Minutes