11 हेल्थ सौंदर्य ब्युटी तुरटी / फिटकारीचे आश्चर्य कारक फायदे भाग – 1
तुरटी ही आपल्या परिचयाची आहे. तुरटीला हिन्दी मध्ये फिटकारी व इंग्लिश मध्ये Alum असे म्हणतात. तुरटी ही एक रंगहीन रसायन पदार्थ आहे, ती क्रिस्टल सारखी दिसते. तुरटीचे रासायनिक नाव पोट्याशियम एल्युमिनियम सल्फेट आहे. तुरटीचे खूप फायदे आहेत व तोटे सुद्धा आहेत. तुरटीचा उपयोग सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर करतात.
तुरटीचे फायदे व तोटे काय आहेत ते आपण जाणून घेऊ या. तुरटीमुळे आपली त्वचा, पाणी, चेहरा, मुरूम, खोकला व दात दुखी ह्यावर फायदेशीर आहे.
1 तुरटीचा उपयोग आपण पाणी साफ करण्यासाठी करतो. किंवा आफ्टर शेवसाठी सुद्धा करतो. तुरटीमध्ये एंटी-बैक्टीरियल गुण आहेत. एक छोटे पिंप किंवा हंडा ह्यामध्ये फक्त एकदाच फिरायची जास्त वेळा फिरवली तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा होवू शकतात..
2. जर आपल्या चेहर्यावर सुरकुत्या आल्या असतील तर तुरटीचा तुकडा घेवून पाण्यात घालून मग चेहर्यावर हळुवार पणे फिरवा. मग थोडा वेळानी चेहरा स्वछ धुवा.
3. चेहर्यावर पुटकुळ्या अथवा मुहासे किंवा पिंपल आले असतील तर तुरतीचा उपयोग केल्यास पिंपल निघून जातील त्यासाठी तुरटीची पेस्ट बनवून मुरूम वरती लावा मग थोडावेळानी धुवून टाका. येथे तुरटी अस्ट्रिन्जन्टचे काम करते.
4. काही व्यक्तींना खूप घाम येतो मग शरीराला दुर्गंधी येते. त्यासाठी एका डब्यात तुरटीची पावडर बनवून ठेवा. अंघोळीच्या पाण्यात एक चिमुट तुरटी घालून मग त्या पाण्यानी अंगोळ करा. तुरटी येथे नेचरल डियोडेरेंटचे काम करते. पण हे रोज करू नका.
5. दातांच्या आरोग्यासाठी तुरटी ही फायदेशिर आहे. तुरटीमध्ये एंटी-बैक्टीरियल गुण आहेत त्यामुळे दात दुखत असतील किंवा तोंडाचा वास येत असेल तर तुरटीच्या पाण्यानी गार्गल करा येथे तुरटी नेचरल माऊथवॉशचे काम करते.
6. जर तोंड आले म्हणजेच छाले आले असेलतर त्यासाठी तुरटीच्या पाण्यानी 30 सेकंद गार्गल करा मग साध्या पाण्यानी स्वछ तोंड धुवा. असे दिवासातून 2-3 वेळा करा म्हणजे छाले बरे होतील.
7. दमा किंवा खोकला झाला असेलतर त्यासाठी तुरटीचा उपयोग म्हणजे अगदी रामबाण उपाय आहे. एक चिमुट तुरटी घेवून त्यामध्ये मध मिक्स करून घ्या, ह्या मधाच्या चाटणाने दमा किंवा खोकला लवकर बरा होतो.
8. जर केसांना वास येत असेल किंवा उवा झाल्या असतील तर तुरटीचा घरगुती उपाय करा. अंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवून त्या पाण्यानी केस धुवा म्हणजे उवा सुद्धा मरतील दुर्गंधी सुद्धा जाईल.
9. युरीन इन्फेकशन साठी सुद्धा तुरटी फायदेमंद आहे. तुरटीच्या पाण्यानी प्रायव्हेट पार्ट धुवा.
10. आपल्या चेहर्याची स्कीन टाईट करण्यासाठी उपयोगी आहे. त्यासतही गुलाबजल म्हणजेच रोज वॉटरमध्ये थोडेशी तुरटी घालून ते आपल्या चेहर्याला लावावे मग थंड पाण्यानी चेहरा धुवावा. पण चेहर्यावर लावताना डोळ्याच्या जवळ लावू नये.
11. जर काही लागून शरीरावर जखम झाली व रक्तस्त्राव थांबत नसेलतर त्यावर तुरटीचे पाणी घालून साफ करा लगेच रक्तस्त्राव थांबेल.
तुरटीचे काही तोटे सुद्धा आहेत.
1. तुरटीचा जर आपण वास घ्यायला गेलो तर घशाला किंवा नाकाला त्रास होऊ शकतो.
2. आपल्या त्वचेवर लावल्यावर स्कीन किंवा डोळ्यांना जळजळ झाली किंवा अंगावर पुरळ आलीतर लगेच डॉक्टरकडे जा.
The Marathi language video of these Beauty and Skin Tips can be seen here – Beauty and Skin Tips Using Turti / Alum