स्त्रीया व पुरुषांसाठी चेहर्यावर आइस क्यूब लावण्याचे अद्भुत 8 फायदे इन मराठी
आइस क्यूब म्हणजेच बर्फ हा आपल्या त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. बर्फ हा फक्त कोल्डड्रिंक थंड करण्यासाठी नाहीतर आपली त्वचा थंड, सुंदर मुलायम बनवतो त्याने त्वचा ताजी दिसून चकाकी येते. अंगावर सूज आलीतर आइस क्यूबने शेकल्यास सूज कमी होते. आपल्या चेहर्याला आइस क्यूबनी मसाज करतांना वेगवेगळ्या प्रकारचे आइस क्यूब आपण घरी बनवू शकतो. आपल्याला आपल्या चेहरा सुंदर व ताजा टवटवीत बनवण्यासाठी स्वस्त व मस्त आइस क्यूब घरीच बनवू शकतो. ते आपण पुढच्या विडियोमध्ये बघणार आहोत.
1) तरुण मुलांमध्ये नेहमी मोठा प्रश्न असतो तो म्हणजे पिंपल्स म्हणजे तारुण्य पटिका. पुटकुळया किंवा मुरूम त्यासाठी घरगुती सोपा उपाय म्हणजे आपल्या चेहर्यावर बर्फ फिरवायचा. पण बर्फ एका सूती कापडात गुंडाळून मगच आपल्या चेहर्यावर फिरवायचा किंवा चेहर्यावर ज्या ठिकाणी पिंपल्स आले आहेत त्यावर हळुवारपणे फिरवायचा त्यामुळे पिंपल्स थोडे कोरडे होवून त्याचा लालसर पणा कमी होवून त्याचे दुखणे सुद्धा कमी होते व ते आजूबाजूला पसरत नाही.
2) ज्या महिला पार्लरमध्ये थ्रेडिंग अथवा वैक्सिंग करतात. थ्रेडिंग अथवा वैक्सिंग केल्याने त्या ठिकाणची जागा लालसर होते तेव्हा त्याजागेवर बर्फ फिरवलातर थंड वाटते व त्वचा मऊ होते. तसेच आपली त्वचा चमकदार दिसते व ब्लड-सर्कुलेशन चांगले होते.
3) जर चेहर्याची त्वचा कोरडी असेलतर 3 बदामची पेस्ट करून बर्फाच्या सहायानी चेहर्यावर फिरवा. किंवा तेलकट त्वचा असेलतर बर्फाबरोबर लिंबूरस लावा.
4) आपल्या चेहर्यावर एक आइस क्यूब फिरवून आपली त्वचा उजळते. उन्हामध्ये आपली त्वचा काळी पडते तर बर्फ हा अगदी फायदेमंद आहे. ब्लड-सर्कुलेशन चांगले होऊन चकाकी येते. चेहर्यावर मेकअप करण्या अगोदर नेहमी बर्फ फिरवावे.
5) वयोमानाप्रमाणे चेहर्यावर सुरकुत्या येतात व त्वचा काळवंडते त्यासाठी आइस क्यूब खूप फायदेमंद आहे. तुम्ही एका टॉवेलमध्ये काही आइस क्यूब घेवून त्याने मालीश करून शकता त्यामुळेपण त्वचा चांगली होते. किंवा चेहर्यावर कशाची अलर्जी आली असेल व त्वचा लाल झाली असेलतर बर्फ फिरवणे हा एक चांगला उपाय आहे.
6) डोळ्याच्या खाली त्वचा काळी झाली असेलतर रोज एका सूती कापडात आइस क्यूब घेवून डोळ्याच्या खाली फिरवावा म्हणजे त्वचेचे सेल्स डेड झाले असतीलतर परत पहिल्या सारखे होतात व त्वचा छान स्वच्छ होते. व त्वचेची छिद्र मोकळी होतात.
7) डोळे दुखत असतीलतर एका सूती कापडामद्धे आइस क्यूब घेवून डोळ्यावर बर्फानी हळूहळू शेकले तर डोळ्याची जळजळ कमी होते. व डोळे शांत राहतात.
8) चेहर्यावर नको असलेले केस काढण्यासाठी आइस क्यूब मोठे काम करतो. पुरुषांच्या चेहर्यावर केस असलेले चांगले पण स्त्रीच्या चहर्यावर केस असणे म्हणजे एक डोके दुखी आहे त्यासाठी नियमित चेहर्यावर आइस क्यूब फिरवा हळूहळू चेहर्यावर केस येणे बंद होईल.
The Marathi language video of this article on Beauty Tips for Glowing Skin can be seen here – Benefits of Applying Ice Cubes on Face for Beauty and Flawless Skin