5 मिनिटात 1/2 लिटर बेसिक आईसक्रिम पासून 2 लिटर वेगवेगळे सॉफ्टी आईसक्रिम कसे बनवायचे भाग – १ रेसिपी
बेसिक आईसक्रिम म्हणजे आईसक्रिम बनवण्याच्या आगोदारचा बेस होय. हा बेस बनवून ठेवला की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे त्या प्रकारचे सॉफटी आईसक्रिम बनवू शकतो. हा बेस आपण १५-२० दिवस सुद्धा ठेवू शकता. बेसिक आईसक्रिम हे सॉफ्टी आईसक्रिम बनवण्यासाठी वापरायचे आहे. सॉफ्टी आईसक्रिम मध्ये आपण आंबा, पेरु, व्हनीला, स्ट्रॉबेरी, बटर स्कॉच, गुलकंद अशी वेगवेगळी बनवू शकतो.
ह्या पद्धतीने बनवलेले सॉफ्टी आईसक्रिम अगदी बाजार मधील आईस्क्रीम सारखे मुलायम व अप्रतीम बनते.
बेस बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
सेट करण्यासाठी वेळ: ७-८ तास
वाढणी: 15 जणांना
आईस्क्रीम बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
आईस्क्रीम सेट वेळ: 2 तास
साहित्य:
बेसिक आईसक्रिम:
२ १/२ कप दुध (गाईचे) किंवा १/२ लिटर
५ टे स्पून साखर
२ टे स्पून मिल्क पावडर
१ १/२ टे स्पून कॉर्नफ्लोर
१ १/२ टे स्पून GMS पावडर
१/८ टी स्पून स्टॅबिलायझर पावडर
कृती:
पाव लिटर दुध तापवायला ठेवा. उरलेल्या दुधात साखर, मिल्क पावडर, कॉर्नफ्लोर, GMS पावडर, स्टॅबिलायझर पावडर घालून मिक्स करून गरम करत ठेवलेल्या दुधात मिक्स करून पाच मिनिट दुध मंद विस्तवावर हलवत गरम करून घ्या. मिश्रण गरम झाल्यावर थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर डीप फ्रीझमध्ये ७-८ तास सेट करायला ठेवा.
बेसिक आईसक्रिम सेट झाल्यावर बाहेर काढून त्याचे तुकडे करून त्यामध्ये क्रीम घालून पाहिजे त्या प्रकारचे आईसक्रिम बनवू शकता.
1) वनीला आईस्क्रीम
1/4 बेसिक आईस्क्रीम बेस
2 टे स्पून क्रीम (अमूल किंवा सोया क्रीमजे केकच्या आयसिंग साठी वापरतात)
1/4 टी स्पून वनीला इसेन्स
कृती:
एका जर्मनच्या भांड्यात बनवलेले 1/4 आईस्क्रीम बेस घ्या त्यामध्ये 2 टे स्पून क्रीम व 1/4 टी स्पून वनीला इसेन्स घेवून हँड मिक्सरने 2-3 मिनिट ब्लेण्ड करून घ्या. ब्लेण्ड झाल्यावर फ्रीजरमध्ये 2-3 तास ठेवा. आईस्क्रीम सेट झाल्यावर सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून चॉक्लेट सॉस किंवा स्ट्रॉबेरी सॉस घालून सजवून सर्व्ह करा
2) स्ट्रॉबेरी आईस्क्रीम
1/4 बेसिक आईस्क्रीम बेस
2 टे स्पून क्रीम (अमूल किंवा सोया क्रीमजे केकच्या आयसिंग साठी वापरतात)
2 टे स्पून स्ट्रॉबेरी पप्ल (किंवा स्ट्रॉबेरी मिक्सर मधून काढा)
कृती: वनीला आईस्क्रीम प्रमाणे करा
3) बटरस्कॉच आईस्क्रीम
1/4 बेसिक आईस्क्रीम बेस
2 टे स्पून क्रीम (अमूल किंवा सोया क्रीमजे केकच्या आयसिंग साठी वापरतात)
1 टे स्पून मध
2-3 चिमुट लेमन यल्लो कलर
1/4 टी स्पून बटरस्कॉच इसेन्स
कृती: वनीला आईस्क्रीम प्रमाणे करा
बटरस्कॉच आईस्क्रीमसाठी प्रेलाईन:
प्रेलाईन म्हणजे बटर स्कॉच आईसक्रिम साठी साखर जाळून (डार्क ब्राऊन) करून त्याचे तुकडे आईस्क्रीम मध्ये मिक्स करायचे. आईसक्रिम खाताना ते तुकडे छान क्रंची लागतात.)
१/२ टी स्पून तूप
१/४ कप साखर
४ बदाम (तुकडे करून)
४ काजू (तुकडे करून)
कृती:
Praline घरी कसे बनवायचे: नॉनस्टिक तव्यावर साजूक तूप गरम करून त्यामध्ये साखर घालावी व मध्यम आचेवर साखर डार्क ब्राऊन होई परंत गरम करावी मग त्यामध्ये बदाम व काजूचे तुकडे घालून मिक्स करावे व थंड करायला ठेवावे. थंड झाल्यावर त्याचे तुकडे करावे.
4) मॅंगो आईस्क्रीम
1/4 बेसिक आईस्क्रीम बेस
2 टे स्पून क्रीम (अमूल किंवा सोया क्रीमजे केकच्या आयसिंग साठी वापरतात)
1/2 कप मॅंगो पल्प
2 चिमुट लेमन यल्लो कलर
कृती: वनीला आईस्क्रीम प्रमाणे करा. फक्त मॅंगो पल्प बनवताना हापुस अंबा रस काढून थोडा गरम गरम करून थंड करा म्हणजे क्रिस्टल होणार नाही.
5) गुलकंदाचे आईसक्रिम रोझ पेटल जाम आईसक्रिम
साहित्य:
१ कप किंवा १/४ बेसिक आईसक्रिम भाग
२ टे स्पून फ्रेश क्रीम
१ टे स्पून रोझ सिरप
१/४ टी स्पून रोझ इसेन्स
२ टे स्पून गुलकंद
कृती: वनीला आईस्क्रीम प्रमाणे करा.
The Marathi language video of this softy ice cream recipe can be seen here – Easily Make Different Softy Ice Cream In 5 Minutes