घरी बनवा क्रिस्पी झटपट पोटैटो स्माइली मकीन्स सारखी
स्माईली हा छान कुरकुरीत पदार्थ मुलांना खूप आवडतो. अगदी बाजारातील मकीन्स सारखी स्माईली आपण घरच्या घरी आगदी सोप्या पद्धतीने बनवता येते अगदी कमी वेळात झटपट बनवता येते. तसेच आपण स्माईली बनवून 10-15 दिवस छान स्टोर सुद्धा करू शकतो व आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळू शकतो. स्माईली कशी स्टोर करायची ते पण ह्या विडियो मध्ये संगितले आहे.
स्माईली आपण मुलांना शाळेत जातांना छोट्या सुट्टीसाठी किंवा नाश्त्याला किंवा पार्टीच्या वेळी स्टार्टर म्हणून सुद्धा बनवू शकतो. स्माईली ही दिसायला सुद्धा आकर्षक दिसते आपण टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करू शकतो. स्माईली बनवताना बटाटे, कॉर्न फ्लौर वापरले आहे.
बनवण्यासाठी वेळ: 40 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
4 मोठ्या आकाराचे बटाटे
2 ब्रेड स्लाईस
4 टे स्पून कॉर्न फ्लौर किंवा तांदळाचे पीठ
1/4 टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
तळण्यासाठी तेल
कृती:
प्रथम बटाटे स्वच्छ धुवून उकडून सोलून घ्या. ब्रेडचे स्लाईस मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मग बटाटे किसून एका बाउलमध्ये घ्या. मग किसलेल्या बटाट्यामध्ये ब्रेडचा चुरा, कॉर्न फ्लौर, लाल मिरची पावडर, मीठ घालून चांगले मळून घ्या. वरतून तेलाचा हात लावून परत मळून घ्या. मग मळलेला गोळा झाकून फ्रीज मध्ये 25-30 मिनिट ठेवा.
मग मळलेल्या गोळ्याचे तीन भाग करून घ्या. एक भाग थोडा जाडसर थापून घेवून गोल झाकणानी कट करून घ्या. एक सारखे सगळे कापून झाल्यावर एक स्ट्रॉ घेवून त्या गोल कापलेल्या चकतीवर दोन भोक करा म्हणजे ते दोन डोळे होतील व एक चमचा घेवून तोंडाचा आकार करा. अश्या प्रकारे सर्व स्माईली बनवून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये स्माईली तळून घ्या. प्रथम विस्तव मोठा करा व स्माईली तेलात घालून मग मध्यम विस्तवावर तळून घ्या.
गरम गरम स्माईली टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.
टीप:
जर आपल्याला स्माईली स्टोर करून ठेवायच्या असतील तर एका ताटात कच्या स्माईली ठेवा व फ्रीजरमध्ये दोन तास ठेवा मग त्या छान कडक होतील. मग बाहेर काढून एका झीप लॉक प्लॅस्टिक बॅगमध्ये भरून झीप लावून परत फ्रीजर मध्ये 10-15 दिवस छान राहतात जेव्हा पाहिजे तेव्हा तळून सर्व्ह करून शकता. फक्त तळताना तेल चांगले कडकडीत गरम करून मग तळा.
The Marathi language video of this Smily Making recipe can be seen here – How to Make Smiley Potato Mukins for Kids at Home