नाश्त्यासाठी राहिलेल्या भाताचे झटपट टेस्टी चमचमीत डोसे मुलांसाठी
कधी कधी आपला भात लावायचा अंदाज चुकतो किंवा घरातील व्यक्ती जेवली नाही तर भात तसाच उरतो. मग राहीलेला भात टाकून द्यायचा पण जीवावर येते. व गरम करून खायचा पण कंटाळा येतो. तेव्हा मग अश्या प्रकारचे पौस्टीक डोसे बनवून बघा घरात सगळ्याला आवडतील.
उरलेल्या भाताचे डोसे बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, व दही वापरले आहे. तसेच जर तुम्हाला चटणी बनवण्याचा कंटाळा आला असेल तर ह्यामध्येच हिरवी मिरची, आले व कोथबिर घाला खूप छान लागतात.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 10-12 डोसे बनतात
साहीत्य:
1 ते 1 1/2 कप भात (शीळा)
1/2 कप गव्हाचे पीठ
1 कप तांदळाचे पीठ
2 टे स्पून दही (आंबट)
3-4 हिरव्या मिरच्या
1” आले तुकडा
1 टी स्पून जिरे
1 पिंच बेकिंग सोडा
1/4 कप कोथबिर
मीठ चवीने
तेल डोसे भाजण्यासाठी
कृती:
मिक्सरच्या भांड्यात भात, तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ हिरव्या मिरच्या, आले, जिरे घालून थोडे ग्राईड करून घ्या. मग त्यामध्ये एक कप पाणी घालून परत चांगले ग्राईड करून घ्या.
ग्राईड केलेले मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्या. एमजी त्यामध्ये दही, मीठ व कोथबिर घालून चांगले मिक्स करा जरूर वाटल्यास परत थोडे पाणी घाला. मिश्रण डोश्याच्या पीठा सारखे पातळ झाले पाहिजे. मग त्यामध्ये बेकिंग सोडा घालून परत मिक्स करून घ्या.
पॅन गरम करायला ठेवा व त्यावर थोडे तेल लावून एक डाव मिश्रण घालून पसरवून घ्या बाजूने थोडे तेल सोडा मग दोन्ही बाजूंनी डोसा चांगला भाजून घ्या.
गरम गरम डोसा सर्व्ह करा.
डोसा चटणी बरोबर सर्व्ह करणार असला तर डोश्याचे पीठ बनवतांना हिरवी मिरची, आले घालू नका. प्लेन डोसा बनवा.
The Marathi language video of this Dosa Recipe can be seen here – Crispy and Tasty Dosa with Leftover Rice