स्वस्त व मस्त बटरस्कॉच मिठाई खवा व मावा शिवाय
बटरस्कॉच मिठाई आपण कधी सुद्धा बनवू शकतो. बनवायला झटपट होणारी आहे तसेच स्वस्त व मस्त आहे. कोणी पाहुणे येणार असतील तर आपण घरच्या घरी अश्या प्रकारची मिठाई बनवू शकतो.
बटरस्कॉच मिठाई बनवतांना साजूक तूप, मैदा, साखर, मिल्क पावडर व बटर स्कॉच इसेस्न्स वापरला आहे. व रंगीत टुटी फ्रूटी वापरली आहे. ही मिठाई बनवतांना खवा किंवा मावा वापरलेला नाही त्यामुळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
2 टे स्पून साजूक तूप
1 कप मैदा
3/4 कप साखर
1 टे स्पून मिल्क पावडर
1 टे स्पून टूटी फ्रूटी
4-5 थेंब बटरस्कॉच इसेन्स
कृती:
एका पॅनमध्ये तूप गरम करून घ्या. मग त्यामध्ये मैदा 5 मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मैदा भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
पॅन मध्ये साखर व अर्धा कप पाणी घेऊन 2 तारी पाक बनवून घ्या. पाक झालकी त्यामध्ये भाजलेला मैदा घालून घट्ट होईस तोवर गरम करून घ्या. मग त्यामध्ये मिल्क पावडर, बटरस्कॉच इसेन्स व टूटी फ्रूटी घालून थोडे गरम करून घ्या.
एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून घेवून त्यामध्ये मिश्रण काढून एक सारखे थापून घ्या. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या व सर्व्ह करा.
The Marathi language video of this Butterscotch Mithai can be seen here – Cheap and Best Tasty Butterscotch Mithai without Mawa