क्रिस्पी टेस्टी उपवासासाठी साबुदाणा पापडी इडली स्टँडमध्ये बनवा रेसिपी
उपवास म्हंटले की आपल्याला उपवासाचे नानाविध पदार्थ बनवता येतात तसेच उपवासाचे साठवणीचे पदार्थ बनवले तर आपल्याला वर्षभर वापरता येतात. तसेच सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा तळता येतात.
उपवासाचे साबुदाणा पापडी इडली स्टँड मध्ये बनवली आहे. साबुदाणा पापडी बनवायला अगदी सोपी आहे, अश्या प्रकारच्या पापड्या तळल्यावर एकदम तीपट साईजनी मोठ्या होतात. तसेच टेस्टी हलक्या होतात. साबुदाणा पापड्या बनवताना आपण त्या विविध रंगामध्ये सुद्धा बनवू शकतो. त्यामुळे त्या दिसायला खूप आकर्षक दिसातात.
बनवायसाठी वेळ: 45
वाढणी: 70 बनतात
साहीत्य:
2 कप साबुदाणा
1 टी स्पून जिरे
मीठ चवीने
पिवळा व ऑरेंज रंग
तेल इडली स्टँडला लावण्यासाठी
कृती:
ज्या दिवशी आपल्याला साबुदाणा पापड्या करायच्या आहेत त्याच्या आधल्या दिवशी रात्री साबुदाणा धुवून घ्या, 2 कप साबुदाणा साठी 1 1/4 कप पाणी घाला व झाकून ठेवा.
दुसर्या दिवशी सकाळी त्यामध्ये मीठ घालून हातानी मिक्स करून घ्या.
दोन लहान वाट्यात 1 – 1 टी स्पून पाणी घेवून एका वाटीत ऑरेंज रंग व दुसर्या वाटीत पिवळा रंग घालून मिक्स करूंघ्या.
मग भिजवलेल्या साबुदाण्याचे तीन एक सारखे भाग करून घ्या. एका भागामध्ये जीरे घाला. दुसर्या भागात पिवळा रंग व तिसर्या भागात ऑरेंज रंग घालून मिक्स करून घ्या.
इडली पात्राला तेल लावून घ्या व प्रतेक साचामध्ये 1 चमचा साबूदाण्याचे मिश्रम घालून बोटानी पसरवून घ्या.
कुकर किंवा इडली पात्र मध्ये पाणी घालून इडली स्टँड आत ठेवा झाकणाची शीटी काढून 12 मिनिट वाफवून घ्या. 12 मिनिट झाल्यावर झाकण काढून स्टँड बाहेर काढून ठेवा व थंड झाल्यावर साबुदाणा पापड्या हळुवार प्लॅस्टिक पेपर वर काढून ठेवा. अश्या प्रकारे सर्व पापड्या बनवून प्लॅस्टिक पेपरवर ठेवा. मग कडकडीत उन्हात वाळत ठेवा. 2-3 दिवस चांगले ऊन द्या व वाळल्यावर डब्यात भरून ठेवा, पाहीजे तेव्हा तळून खाऊ शकता.
The Marathi language video of this Fasting Recipe can be seen here – Crispy and Tasty Upvasasathi Sabudana Papad