अक्षय तृतीया 2020माहीती मुहूर्त पुजा मंत्र महत्व दानधर्म
अक्षय तृतीया ह्या दिवसाचे हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. धार्मिक रूप असलेली अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया तिथि ह्या दिवशी साजरी करतात. ह्या वर्षी अक्षय तृतीया 26 एप्रिल 2020 रविवार ह्या दिवशी आहे. हिंदू पंचांगनुसार ह्या वर्षी अक्षय तृतीया रोहिणी नक्षत्र च्या बरोबर अबूझ मुहूर्त आहे त्यामुळे ती खूप शुभ मानली जाते. अक्षय तृतीया ह्या दिवशी आपण माता लक्ष्मी ह्यांना प्रसन्न करण्यासाठी कोणते मुहूर्त आहेत ते पाहूया. तसेच लक्ष्मी माताचा मंत्र, लक्ष्मी माताची पुजा कशी करायची, अक्षय तृतीयाचे काय महत्व आहे, कोण कोणते दान धर्म करावे, व काय करावे काय करू नये.
अक्षय तृतीया मुहूर्त-
तृतीया तिथि प्रारंभ: 11:50 वाजून (25 अप्रैल 2020)
तृतीया तिथि समाप्ती: 13:21 पर्यन्त (26 अप्रैल 2020)
माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पुजा कशी करावी.
अक्षय तृतीया ह्या दिवशी घरातील सर्व दाग दागिने कच्या दुधानी व गंगाजलनी धुवावी मग एका लाल रंगाच्या कापडात ठेवून त्याला केसर, हळद- कुकु लावून, लाल रंगाचे फूल वाहून पूजा करावी. पुजा झाल्यावर खाली दिलेला मंत्र पूर्ण श्रद्धेने म्हणावा.
मंत्र अश्या प्रकारे आहे.
“ॐ ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद महालक्ष्मयै नम:”
हा मंत्र 108 वेळा म्हणावा. मग माता लक्ष्मीची आरती म्हणावी व संध्याकाळी दाग दागिने परत कपाटात ठेवावी.
अक्षय तृतीया महत्व:
अक्षय तृतीया हा पूर्ण दिवस शुभ मानला जातो. ह्या दिवशी कोणते सुधा चांगले कार्य करण्यासाठी पंचांग बघायची गरज नाही. ह्या दिवशी केलेले कोणते सुद्धा शुभ कार्य वाया जात नाही. अक्षय तृतीया ह्या दिवशी लग्न कार्य, धार्मिक कार्य, गृह प्रवेश, व्यापार सुरवात, जप-तप, पूजा पाठ करण्यासाठी खूप चांगला दिवस आहे. साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त मानला जातो.
हिंदू धर्मा नुसार अक्षय तृतीया ह्या दिवशी भगवान विष्णुचा सहावा अवतार म्हणजे भगवान परशुराम ह्याचा जन्म झाला होता. भगवान परशुराम हे महर्षि जमदाग्नि व माता रेनुकादेवी ह्याचे सुपुत्र होते. म्हणूनच अक्षय तृतीया ह्या दिवशी भगवान विष्णु व भगवान परशुराम ह्याची पुजा करतात.
ह्या दिवशी सोने खरेदी करतता म्हणजे आपल्या धनामध्ये वाढ होते. तसेच आपल्या कमाईतून काही हिस्सा दान करावा. असे केले तर आपल्याला अपार धन प्राप्ती होते. सर्व तिथीमध्ये अक्षय तृतीया ही तिथी सर्वात चांगली मानली जाते. शास्त्रा नुसार असे म्हणतात की ह्या दिवशी सर्व पापांचा नाश होवून सुख संपत्ती प्राप्त होते. ह्या दिवशी कोणतेपण चांगले केलेले कार्य पूर्ण सफल होते.
अक्षय तृतीया ह्या तिथीचा लोक वर्षभर वाट पाहात असतात.
अक्षय तृतीया ह्या दिवसाला सत्ययुग व त्रेता युगची सुरवात झाली.
अक्षय तृतीया ह्या दिवशी भगवान परशुराम ह्याचा जन्म झाला.
अक्षय तृतीया ह्या दिवशी माता गंगा ह्याचा उगम झाला.
अक्षय तृतीया ह्या दिवशी वेद व्यास ह्यांनी महाभारत ग्रंथ लिहायला सुरवात केली होती.
अक्षय तृतीया ह्या दिवशी बद्रिनाथ ह्या चारधाम पैकी एक धाम ह्याचे दरवाजे उघडले जातात व त्या दिवशी पासून दर्शन घ्यायला मिळते.
अक्षय तृतीया ह्या दिवशी चुकून सुद्धा खाली दिलेली कामे करू नका.
शास्त्रा नुसार अक्षय तृतीया ही शुभ तिथी आहे. ह्या दिवशी केलेले चांगले कार्य नेहमी सफल होते.
अक्षय तृतीया ह्या दिवशी कोणाचे पण मन दुखवू नका.
अक्षय तृतीया ह्या दिवशी सात्वीक शाकाहारी आहार घ्या.
पुजा अर्चा करून मन प्रसन्न ठेवा.
अक्षय तृतीया 26 एप्रिल रविवार ह्या दिवशी धार्मिक महत्व आहे. ह्या दिवशी वस्तूची खरेदी केलेली चांगले मानतात. हयदिवशी सोने चांदी वाहन, घर घरात एखादी नवीन वस्तु खरेदी करतात. त्यामुळे घरात माता लक्ष्मीची कृपा नेहमी राहते.
परंतु ह्या वर्षी महामारी (वायरस च्या मुळे संपूर्ण देशात लॅाकडाउन हे म्हणजेच बंद आहे त्यामुळे हयावर्षी खरेदी करता येणार नाही.
आज तुम्हाला सांगू इछीते की पूजा करतांना ह्या पाच वस्तु शामील करा त्यामुळे सोने खरेदीचे पुण्य आपल्याला मिळेल. ह्या वस्तु आपल्याला अगदी सहजपणे उपलब्ध होतात.
मातीची पणती किंवा दिवा:
धार्मिक म्हणण्यानुसार माती चे महत्व हे सोन्याच्या बरोबर आहे. माती आपल्याला सहज प्राप्त होऊ शकते.
सीझन प्रमाणे फळ:
ह्या सीझनमध्ये जे फळ असेलते नक्की अर्पण करा. ह्या दिवशी फळाचा नेवेद्य दाखवतात.
सेधव मीठ:
अक्षय तृतीया ह्या दिवशी सेधव मीठ घरात ठेवणे शुभ मानले जाते.
पिवळी मोहरीची डाळ:
धांर्मिक मान्यता नुसार घरात पिवळी मोहरीची डाळ ठेवली तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते. ह्या दिवशी पूजा थाळीमध्ये पिवळी मोहरीची डाळ ठेवा. असे केल्याने आपली आर्थिक परेशनी दूर होईल व माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देईल.
कापूस:
पूजा थाळी मध्ये कापूस ठेवावा शुभ मानले जाते.
अक्षय तृतीया ह्या दिवशी खालील गोष्टी दान कराव्या त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. जर ह्या दिवशी खाली दिलेल्या गोष्टी दान केल्यातर आपल्याला उदंड आयुष मिळते, धनधान्य व संपत्ती प्राप्त होते.
दान धर्म:
1) अक्षय तृतीया ह्या दिवशी पाणी दान करतात म्हणून ह्या दिवसा पासून जागो जागी पाणपोई ठेवतात त्यामुळे तहानलेल्याला पाणी मिळेल. पाणी दान केल्याने खूप पुण्य मिळते.
2) विवाह झालेल्या महिलांनी कुकु दान केले तर अखंड सौभाग्य प्राप्त होते.
3) अक्षय तृतीया ह्या दिवशी चन्दन दान केले तर आपघात होत नाही.
4) अक्षय तृतीया ह्या दिवशी खायची वेड्याची पाने दान केली तर आपल्याला चांगली पोस्ट मिळते.
5) नारळ म्हणजेच श्रीफळ हे आपण दान केलेतर आपल्या सात पीढ्यांना स्वर्गात जागा मिळते असे म्हणतात.
6) अक्षय तृतीया ह्या दिवशी ताक दान केले तर आपल्याला चांगली बुद्धि प्राप्त हौऊन आपली खूप प्रगती होते.
7) अक्षय तृतीया ह्या दिवशी स्लीपर दान केलीतर आपल्याला स्वर्गात जागा मिळते असे म्हणतात.
8) अक्षय तृतीया ह्या दिवशी बेड व कपडे दान केला तर आपल्याला जीवनात आनंद मिळतो.
Happy Akshaya Tritiya …
The Marathi language video of this article on Akshaya Tritiya can be seen here – Akshaya Tritiya 2020 information about Mantra, Timings and Worship