सोपे पौष्टिक परफेक्ट भटूरे मैदा ईस्ट बेकिंग सोडा न घालता कमी तेलात बनवा रेसिपी
सोपे पचायला हलके बिना मैदा ईस्ट बेकिंग सोडा भटूरे
छोले भटूरे ही डिश पंजाबी लोकांची आवडती व लोकप्रीय डीश आहे पण आता प्रतेक प्रांतात सगळे आव
डीने करतात फक्त पद्धत निराळी आहे. छोले भटूरे आपण जेवणात किंवा नात्याला सुद्धा बनवू शकतो. किंवा ब्रंच साठी सुद्धा बनवू शकतो.
भटूरे बनवतांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतात. काही जणांना मैदा ईस्ट बेकिंग सोडा खावून त्रास होतो. त्यासाठी फक्त रवा वापरुन आपण छान खुस खुशीत भटूरे बनवू शकतो. रवा वापरुन बनवलेले भटूरे छान टेस्टी लगतात तसेच पचायला हलके होतात. व तळताना तेल सुद्धा कमी लागते.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
2 कप बारीक रवा
2 टे स्पून तेल (कडकडीत)
2 टे स्पून दही
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून साखर
मीठ चवीने
कोमट पाणी रवा भिजवण्यासाठी
तेल भटूरे तळण्यासाठी
कृती:
एका बाउलमध्ये बारीक रवा घेवून त्यामध्ये तेल (कडकडीत), मीठ, हळद व साखर घालून चांगले मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये दही घालून मिक्स करून घ्या. थोडे कोमट पाणी वापरुन पीठ मळून घ्या. मळलेले पीठ दोन तास झाकून बाजूला ठेवा.
मग मळलेल्या पिठाचे एक सारखे गोळे बनवून लाटून घ्या, खूप पातळ लटायचे नाही.
कढईमद्धे तेल गरम करून घ्या. तेल गरम झालेकी भटूरे टाळून घ्या. अश्या प्रकारे सर्व भटूरे लाटून तळून घ्या.
गरम गरम भटूरे छोले बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of this Bhatura recipe can be seen here – Easy to Digest Bhatura Without Yeast, Maida, Baking Powder in less Oil