दुधी भोपळ्यापासून बीना खवा सुंदर पौस्टिक बर्फी रेसिपी
Delicious Bottle Gourd Barfi Without Mawa Recipe
दुधी भोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. दुधीभोपळा पासून आपण भाजी कोफ्ते बनवतो तसेच दुधी भोपळ्या पासून आपण हलवा सुद्धा बनवतो आता आपण दुधी भोपळ्या पासून बर्फी बिना खवा कशी बनवायची ते बघू या.
दुधी भोपळा हा शक्तिदायक आहे. अशक्त लोकांसाठी व आजारी लोकांसाठी तो उत्तम आहे. ज्यांची प्रकृती उष्ण आहे त्यांनी दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने प्रकृती थंड राहते. रक्तातील उष्णता कमी होते.
दुधी भोपळा बर्फी बनवतांना नारळ, दूध व साखर वापरली आहे. दुधीची बर्फी बनवायला अगदी सोपी आहे. तसेच ती पौस्टिक सुद्धा आहे. दुधी भोपळा बर्फी आपण सणवाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
2 कप दुधी भोपळा कीस
3/4 कप दूध
4 टे स्पून साखर
1/2 कप ओला नारळ
1 टे स्पून तूप
1 टी स्पून वेलची पूड
ड्रायफ्रूट सजावटी करिता
कृती:
प्रथम दुधी भोपळा धुवून घ्या. भोपळा घेतांना चांगला ताजा व कोवळा घ्या. त्याची साले काढून कीसून घ्या.
एका जाड बुडाच्या कढईमध्ये 1 टे स्पून तूप गरम करून घेवून त्यामध्ये भोपळ्याचा कीस घालून थोडा तुपावर परतून घ्या. मग कढईवर झाकण ठेवून मंद विस्तवावर 5-7 मिनिट दुधी भोपळा शिजवून घ्या.
मग झाकण काढून दूध घालून दुधी शिजवून घ्या. दुधी शिजला की त्यामध्ये ओला नारळ घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये साखर घाला व चांगले घट्ट होईस पर्यन्त आटवून घ्या.
मिश्रण चांगले घट्ट झाले की त्यामध्ये वेलची पावडर, 1 टे स्पून पिठी साखर व ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घ्या. मिश्रण इतके घट्ट झाले पाहिजे की थोडे तूप सुटायला पाहिजे एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून त्यामध्ये मिश्रण काढून घ्या व एक सारखे थापून घ्या. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या.
The Marathi language video of this Lauki / Bottle Gourd Halwa can be seen here – Dudhi Bhopla Halwa without Mawa