लेमन आइस क्यूब बनवून जेव्हा पाहिजे तेव्हा लेमन ज्यूस बनवता येते इन मराठी
How To Make Durable Lemon Ice Cube In Marathi
टिकाऊ लेमन आइस क्यूब कसे बनवायचे
लिंबाचा सीझन आला की अश्या प्रकारे लेमन आइस क्यूब बनवून ठेवा मग आपल्याला पाहिजे तेव्हा लिंबाचे सरबत बनवता येते किंवा कोणता पदार्थ बनवताना वापरता येते. उन्हाळा आला की ह्या लेमन आइस क्यूब खूप कामाला येतात कारण तेव्हा बाजारात लिंबू खूप महाग असतात.
लिंबाचे लेमन आइस क्यूब बनवून आपण बरेच दिवस छान स्टोर करून ठेवू शकतो. लेमन आइस क्यूब बनवायला अगदी सोपे आहे. व खूप फायद्याचे सुधा आहे.
लेमन आईस क्युबपासून आपण छान थंडगार लिंबू सरबत बनवू शकतो. किंवा रेसीपी बनवतान अश्या प्रकारचे आईस क्युब पण वापरू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
साहीत्य:
10 लिंबू ताजी
आईस ट्रे
गाळणी, भांडे
झिप लॉक प्लॅस्टिक बॅग किंवा चांगली प्लॅस्टिक बॅग
कृती:
प्रथम लिंबू स्वच्छ धुवून पुसून घ्या. मग ती मधोमध कापून घ्या. एका भांड्यावर मोठी गाळणी किंवा चाळणी ठेवून त्यावर सर्व लिंबू रस काढून गाळून घ्या.
मग काढलेला लिंबूरस आईस ट्रे मध्ये एक सारखा ओता. आईस ट्रे फ्रीजरमध्ये 8-10 तास ठेवा, म्हणजे लिंबू रसाचे चांगले आईस क्युब बनतील.
आईस क्युब एका प्लेटमध्ये काढून घ्या. सर्व आईस क्युब एका झिप लॉक बॅगमध्ये भरून ठेवा. झिप लॉक बॅग फ्रीजरमध्ये ठेवून द्या. आपल्याला पाहिजे तेव्हा झिप लॉक बॅगमधून पाहिजे तेव्हडे आईस क्युब काढून परत बॅग फ्रीजरमध्ये ठेवा. लेमन आईसक्युब बरेच दिवस चांगले राहतात.
लिंबूरस काढून झाल्यावर लिंबाची साले टाकून न देता एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा ही लिंबाची साले आपण कुकर लावताना वापरू शकतो.
The video in Marathi of this Lemon Ice Cubes making recipe can be seen here – Procedure of Making Durable Lemon Ice Cubes