लॉक डाउनमध्ये खवा न वापरता फक्त दोन चीज वापरुन हलवाई सारखे बनवा गुलाबजाम
लॉक डाउनमध्ये खवा न वापरता गुलाबजाम कसे बनवायचे
How to make Without Khoya Gulab Jamun in Lock down Recipe
गुलाबजाम म्हंटले की आपल्या डोळ्या समोर खव्याचे गुलाबजाम येतात, पण काही कारणाने आपल्याला खवा नाही मिळाला तर मग आपण अगदी मिठाईच्या दुकानातील गुलाबजाम बनवू शकतो. अश्या प्रकारचे गुलाबजाम बनवायला अगदी सोपे आहेत. व झटपट होणारे आहेत
.
घरी अचानक पाहुणे येणार असतीलतर किंवा सणवाराला किंवा जेवण झाल्यावर स्वीट डिश महणून सुद्धा आपण अश्या प्रकारचे गुलाबजाम बनवू शकतो.
रव्याचे गुलाबजाम मस्त टेस्टी लागतता. मुले अगदी आवडीने खातील बनवून बघा.
साहीत्य:
1 टे स्पून तूप
1 कप बारीक रवा
1 1/2 कप दूध
1 टी स्पून साखर
तेल गुलाबजाम तळण्यासाठी
पाक बनवण्यासाठी:
1 कप साखर
1 1/2 कप पाणी
1 टी स्पून वेलची पूड
कृती:
एका पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवा. तूप गरम झाले की त्यामध्ये बारीक रवा घालून मिक्स करून मंद विस्तवावर 7-8 मिनिट भाजून घ्या, मग त्यामध्ये हळू हळू दूध घालत मिक्स करून त्यामध्ये एक चमचा साखर घालून रवा मंद विस्तवावर चांगला शीजू द्या.
दुसर्या एका भांड्यात एक कप साखर व दीड कप पाणी घालून एक तारी पाक बनवायला ठेवा. पाक तयार झालकी त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून विस्तव बंद करा.
मग शिजलेला रवा एका प्लेट मध्ये काढून घेवून कोमट झाला की चांगला मळून घ्या. मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.
जाड बुडाच्या कढईमद्धे तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झालेकी त्यामध्ये छोटे छोटे गोळे ब्राऊन रंगावर टाळून घ्या. अश्या प्रकारे सर्व गोळे तळून घ्या.
बनवलेला साखरेचा पाक गरम करायला ठेवून त्यामध्ये तळलेले गोळे घालून दोन मिनिट गरम करून घ्या. मग एक तास तसेच झाकून बाजूला ठेवा म्हणजे ते छान पाकामद्धे मुरतील. मग सर्व्ह करा.
The Marathi language video of the procedure of making this Gulab Jamun without Khoya during the period of Lockdown can be seen here – How to make delicious Gulab Jamun without Khoya during Lockdown