सहज सोपी कलिंगड टरबूज किंवा वाटरमेलन ह्या पासून टुटी फ्रूटी कशी बनवायची
टरबूजची साल टाकून न देता त्यापासून बनवा टुटी फ्रूटी
टुटी फ्रूटीहा लहान मुलांना नुसती खायला फार आवडते तसेच टुटी फ्रूटी वापरुन आपण टुटी फ्रूटी केक, टुटी फ्रूटी आईसक्रीम डेझर्ट मध्ये वापरू शकतो. टुटी फ्रूटी दिसायला सुद्धा आकर्षक दिसते.
आजकाल वर्षभर कलिंगड टरबूज किंवा वाटरमेलनचा सीझन चालू असतो. कलिंगड खल्याने आपल्या शरीराला शीतलता मिळते. तसेच त्याची साल आपण टाकून देतो. कलिंगडची साल टाकून न देता त्यापासून आपण टुटी फ्रूटी बनवू शकतो. टुटी फ्रूटी बनवायला अगदी सोपी आहे.
साहीत्य:
1 मध्यम आकाराचे कलिंगड टरबूज
1 कप साखर
2-3 थेंब हिरवा, पिवळा व लाल खायचा रंग
कृती:
कलिंगड टरबूज किंवा वाटरमेलनची साल टाकून न देता त्यापासून टुटी फ्रूटी बनवा. सालाचा बाहेरील हिरवा भाग काढून टाका व पांढर्या भागाचे बारीक बारीक तुकडे फोडी करून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या भांड्यात सर्व तुकडे घेवून त्यामध्ये फोडी बुडून वर थोडे पाणी राहील एव्हडे घ्या. भांडे विस्तवावर ठेवून मध्यम आचेवर 5-7 मिनिट फोडी शिजवून घ्या. फोडी पारदर्शक झाल्या पाहिजे. मग चाळणीवर फोडी काढून घ्या. पाणी पूर्ण निथळू द्या. मग त्याचे एक सारखे तीन भाग करा.
दुसर्या भांड्यात 1 कप साखर घेवून 1 1/2 कप पाणी घ्या व त्याचा पाक बनवायला ठेवा. पाक बनवतांना 1 तारी पाक बनवा. पाक थोडा चिकट झाला पाहिजे.
साखरेचा पाक बनवून झाल्यावर त्याचे एक सारखे तीन भाग करा. एका भागात लाल रंग दुसर्या भागात हिरवा रंग व तिसर्या भागात पिवळा रंग घालून मिक्स करा. प्रतेक रंगामध्ये शिजवलेल्या फोडी घालून हलवून परत विस्तवावर 5 मिनिट गरम करून घ्या. विस्तव बंद करून तिन्ही भांडी झाकून 12 तास तशीच ठेवा. 12 तास झाल्यावर सर्व फोडी एका कापडावर पसरवून ठेवा. त्याफोडी 24 तास तश्याच वाळत ठेवा. वाळल्यावर डब्यात भरून ठेवा. पाहिजे तेव्हा मुलांना खायला द्या किंवा केक, बिस्किट, आईसक्रीम मध्ये वापरा. वर्षभर छान टिकतात.
The Marathi language video of this Tutti Frutti recipe can be seen here – Make Tutti Frutti from Kalingad and Tarbuj Rind