पौस्टीक गूळ पापडी (गहू व गूळ) लाडू मुलांसाठी रेसिपी
गहू व गूळ वापरुन बनवलेले पदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितवाह आहेत. तसेच मुलांना किंवा आजारी माणसांना किंवा मोठ्यांना सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहेत. गव्हाचे पीठ व गूळ वापरुन गूळ पापडी बनवतात. गूळ पापडी ही स्वीट डीश गुजरातमधील लोकप्रीय डीश आहे पण कालांतराने ती सर्व भारतात व बाहेर सुद्धा लोकप्रीय झाली आहे. पण ह्यामध्ये जरा थोडे वेगळेपण करून त्याचे लाडू बनवले आहे. गूळ पापडी लाडू चवीला खूप मस्त लागतात. मुलांना सकाळी शाळेत जातांना किंवा मोठ्यांनी सुद्धा ऑफिसमध्ये जातांना एक लाडू खाल्ला तरी छान त्याचा फायदा होईल.
गहूहा बलदायक, रुचिकारक, पुष्टीदायक, धातूवर्धक कफकारक तसेच तो उत्तम आहार आहे. साखरे पेक्षा गूळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हीतवाह आहे. गुळामध्ये खनीज द्रव्य, आयर्न जीवनस्तव बी-1, बी-2, व सी व ए आहे. तूपतर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती हितावाह आहे ते आपल्याला माहीत आहेच. म्हणजे हे लाडू किती आरोग्य वर्धक आहेत ते आपल्याला कळले असेलच.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 9 लाडू बनतता
साहीत्य:
1 कप गव्हाचे पीठ
4 टे स्पून तूप
1/2 कप गूळ
1 टी स्पून वेलची पावडर
ड्राय फ्रूट
कृती:
प्रथम गूळ किसून घ्या. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून चांगले ब्राऊन रंगावर मंद विस्तवावर भाजून घ्या. गव्हाचे पीठ भाजून झालेकी विस्तव बंद करून कढई खाली उतरवून घ्या. त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करा.
मग त्यामध्ये किसलेला गूळ घालून सारखे हलवत रहा. म्हणजे गूळ पातळ होवून मिश्रण थोडेसे सेल होईल. मग त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून मिक्स करून त्याचे मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या.
लाडू बनवून झालेकी डब्यात भरून ठेवा.
The Marathi language video of this Ladoo recipe can be seen here – Gul Papdi Ladoo (Wheat & Jaggery) For Kids