मुलांसाठी झटपट बटाटा वेफर्स किंवा बटाटा चिप्स अगदी मार्केट सारखे
आता सध्या लॉक डाउन चालू आहे. त्यामुळे घरात सगळ्यांना सुट्टी आहे मग आपल्याला रोज काहीना काही बनवायची डिमांड केली जाते. तर आपण घरी अगदी मस्त बाजार सारखे बटाटा चिप्स किंवा बटाटा वेफर्स बनवू शकतो.
बटाटा वेफर्स किंवा बटाटा चिप्स म्हंटले की मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडतात. आपण घरी अगदी मार्केट सारखे बटाटा वेफर्स बनवू शकतो. बटाटा चिप्स बनवायला अगदी सोपे आहेत. आपण झटपट बनवू शकतो. बटाटा चिप्स आपण टी टाइम स्नॅक्स म्हणून किंवा पार्टीला सुद्धा बनवू शकतो.
बटाटा वेफर्स किंवा बटाटा चिप्स हे दोन प्रकारे बनवले आहेत. पहिला प्रकार प्लेन व दूसरा प्रकार जाळीचा.
साहीत्य:
4 मोठ्या आकाराचे बटाटे
वेफर्स तळण्यासाठी तेल
मीठ व मिरे पावडर चवीने
कृती:
प्रथम बटाटे धुवून सोलून एका भांड्यात पाणी घेवून त्यामध्ये 10 मिनिट भिजत ठेवा. एमजी चिप्सच्या किसणीने चिप्स करून घ्या. मग दुसर्या एका बाउलमध्ये पाणी घेवून त्यामध्ये बनवलेले चिप्स 5 मिनिट ठेवून नंतर पाण्यामधून काढून एका स्वच्छ कापडावर पसरवून ठेवा..
एका कढईमद्धे तेल गरम करून घ्या. तेल गरम झालेकी मध्यम आचेवर बटाटा वेफर्स छान कुरकुरीत तळून घ्या. तळून झालेकी टिशू पेपरवर काढून घ्या, अश्या प्रकारे सर्व वेफर्स तळून घ्या. वरतून मीठ व मिरे पावडर घालून हलक्या हातानी मिक्स करा.
The Marathi language video of this wafers and chips making recipe can be seen here – Make Quick Potato Wafers and Chips at Home for Kids