घरच्या घरी सोपा मस्त झटपट चवीस्ट मिल्क केक:
मिल्क केक हा ओव्हनमध्ये बेक करायची गरज नाही. मिल्क केक बनवायला अगदी सोपा आहे. अश्या प्रकारचा केक उत्तर भारतात लोकप्रीय आहे.
मिल्क केक बनवतांना फक्त दूध व साखर वापरली आहे तसेच केक छान दाणेदार होण्यासाठी दोन चिमुट तुरटी वापरली आहे. त्यामुळे केक छान मऊ होतो. अश्या प्रकारचा केक आपण कोणी पाहुणे येणार असतील किवा स्वीट डिश म्हणून किवा डेझर्ट म्हणून बनवू शकतो.
केक म्हंटले की आपल्या डोळ्या समोर मैदा, बटर साखर, बेकिंग पावडर येते पण मिल्क केक हा अगदी निराळा आहे. घरच्या घरी सोपा मस्त झटपट चवीस्ट मिल्क केक बनवून बघा सर्वांना आवडेल.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
2 लिटर दूध
2 चिमुट तुरटी
2 कप साखर
2 टे स्पून तूप
कृती: दूध गरम करून घ्या. मग त्यामध्ये दोन चिमुट तुरटी पावडर घालून मिक्स करून घ्या, दूध फाटेल व दानेदार होईल. दूध तसेच आटवत ठेवा. मधून मधून हलवत रहा. दूध घट्ट झाले की त्यामध्ये साखर घाला परत आटवत ठेवा. 8-10 मिनिट नंतर त्यामध्ये तूप घाला.
मिश्रण घट्ट होई परंत आटवत ठेवा. नंतर एका खोलगट भांड्याला तुपाचा हात लावून त्यामध्ये मिश्रण ओतून एक सारखे करा. साधारण पणे मिश्रण थंड व्हायला 3-4 तास लागतील मग थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या.
जेवण झाल्यावर स्वीट डिश किवा डेझर्ट म्हणून सर्व्ह करा.