अक्षय तृतीया स्पेशल 2 प्रकार पारंपारिक जिलेबी व इन्स्टंट जिलेबी
आपण आज ह्या विडियो मध्ये दोन प्रकारच्या जिलेबी बघणार आहोत. एक म्हणजे पारंपारिक म्हणजे रवा भिजवून त्यापासून जिलेबी बनवायची व दूसरा प्रकार म्हणजे इन्स्टंट जिलेबी आहे.
पारंपारिक जिलेबी बनवताना प्रथम रवा 10-12 तास भिजवून मग त्यापासून पारंपारिक जिलेबी बनवायची अश्या प्रकारची जेलिबी लग्न कार्यात किंवा पार्टीला बनवतात बनवायला अगदी सोपी आहे. पारंपारिक जिलेबी ही छान कुरकुरीत होते व 2-3 दिवस फ्रीजमध्ये छान राहते॰
इन्स्टंट जिलेबी म्हणजे झटपट बनवायची ह्यामध्ये मैदा वापरला जातो. इन्स्टंट जिलेबी ही छान ज्युसी होते पण ती लगेच संपवावी लागते.
पारंपारिक जिलेबी साहीत्य:
1 कप रवा
1 कप मैदा
1 टे स्पून बेसन
2 टे स्पून दही
1 टे स्पून तेल
2 थेंब ऑरेंज रंग
तूप जिलेबी तळण्यासाठी
पाकासाठी:
1 कप साखर 2 कप पाणी 4-5 केसर कड्या
इन्स्टंट जिलेबी साहीत्य:
1 कप मैदा
1 टे स्पून दही
1/4 कप पाणी (लागेलतसे वापरा)
2-3 थेंब ऑरेंज रंग
1 टी स्पून बेकिंग पावडर
तूप जिलेबी तळण्यासाठी
पाकासाठी:
1 कप साखर, 1 1/2 कप पाणी, 4-5 केसर कड्या
पारंपारिक जिलेबी कृती:
एका बाउलमध्ये रवा, मैदा, बेसन, दही, तेल व रंग घालून चांगले मिक्स करून थोडे पाणी घालून 12 तास झाकून ठेवा. मिश्रण पातळ होता कामा नये मध्यम पाहिजे. जर आपल्याला दुसर्या दिवशी सकाळी जिलेबी बनवायची असेल तर आधल्या दिवशी रात्री मिश्रण भिजवून ठेवा. मग दुसर्या दिवशी सकाळी जिलेबि बनवा.
जिलेबि बनवण्याच्या आगोदर एका जाड बुडाच्या भांड्यात साखर व पाणी घालून मंद विस्तवावर पाक बनवायला ठेवा. पाक बनवताना त्यामध्ये केसर व लिंबूरस घाला व एक तारी पाक बनवून घ्या.
जिलेबिचे मिश्रण चांगले फेटून घ्या. मग एक दुधाची पिशवी घेवून त्याच्या कोर्नरला मिश्रण भरून पिशवीला रबरबॅंड लावून बंद करून कोर्नरला अगदी खूप छोटासा कट करून घ्या.
एका कढईमद्धे तूप किंवा तेल गरम करायला ठेवा व गरम झालेकी त्यामध्ये गोलाकार जिलेबी सोडा व मध्यम विस्तवावर दोनी बाजूंनी तळून घेवून कोमट साखरेच्या पाकात 1-2 मिनिट ठेवा. मग काढून एका स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवा.
इन्स्टंट जिलेबी कृती:
एका भांड्यात मैदा, दही, रंग घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये हळू हळू पाणी मिक्स करून मिश्रण थोडेसे घट्टसरच ठेवा. मग त्यामध्ये बेकिंग पावडर घालून हळुवारपणे मिक्स करून घ्या.
बाकी सर्व कृती वरील प्रमाणे करा.
The Marathi language video of these Jalebi Recipes can be seen here – Paramparik and Zatpat Jalebi Recipes