झटपट सुंदर वॉटरमेलन टरबूज बर्फी
वॉटरमेलन टरबूज बर्फी ही बनवायला अगदी सोपी आहे. टरबूज बर्फी ही दिसायला आकर्षक दिसते तसेच टेस्टी सुद्धा लागते. आपण आता पर्यन्त वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी कश्या बनवायच्या ते पाहिले पण टरबूज बर्फी ही एक निराळीच बर्फी आहेत.
टरबूज बर्फी बनवतांना टरबूज, कॉर्नफ्लोर, पिठीसाखर, वेलची पावडर व साजूक तूप वापरले आहे. जेवणा नंतर आपण डेझर्ट म्हणून सुद्धा वापरू शकतो.
साहीत्य:
1 कप टरबूजचा ज्यूस
2 टे स्पून पिठी साखर
3 टे स्पून कॉर्नफ्लोर
1/4 टी स्पून वेलची पावडर
2 चमचे तूप
ड्रायफ्रूट सजावटी साठी
कृती:
प्रथम टरबूज कापून त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये ब्लेण्ड करून घ्या. मग एका भांड्यात टरबूज ज्यूस, पिठी साखर, कॉर्नफ्लोर चांगले मिस्क करून घ्या. गुठळी राहता कामा नये.
एका जाड बुडाच्या कढईमद्धे मिश्रण घालून मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. मिश्रण चांगले घट्ट होई पर्यंत गरम करा. मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये वेलची पावडर व तूप घालून मिक्स करा.
एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून घ्या. घट्ट झालेले मिश्रण त्यामध्ये ओतून एक सारखे पसरवून घेवून वरतून ड्रायफ्रूट च्या तुकड्यांनी सजवून थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर पाहिजे तो आकार देवून कापून घ्या.
The Marathi language video of this Watermelon Mithai can be seen here – Quick to Make Tarbuz Burfi