2 प्रकारे चायना ग्रास रोझ पूडिंग व चायना ग्रास वनीला पूडिंग मुलांसाठी
चायना ग्रास ही पूडिंग डिश बनवायला अगदी सोपी आहे. लहान मुले सुद्धा अगदी सहजपणे बनवू शकतात. आपल्याला चयना ग्रास ही पूडिंग डिश अगदी वेगवेगळ्या फ्लेव्हरमध्ये बनवता येते.
गरमीच्या सीझनमध्ये अशी थंडगार डिश बनवायला मस्त आहे. तसेच टेस्टी व मुलायम सुद्धा लागते. ह्या विडियोमध्ये दोन प्रकारे चायना ग्रास ही डिश बनवली आहे. खरमध्ये चायना ग्रास हे आपल्या बारीक सेवई सारखे असते ते गरम पाण्यात विरळून त्यापासून पूडिंग बनवतात.
चायना ग्रास पुडिंग बनवतांना चायना ग्रास पावडर वापरली आहे ती बाजारात सहज उपलब्ध होते.
चलातर मग आपण बघूया चायना ग्रास पूडिंग कसे झटपट बनवायचे.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1/2 लिटर दूध
1/2 पॅकेट चायना ग्रास पावडर
1 टे स्पून साखर (एच्छिक)
1) चायना ग्रास वनीला पूडिंग
पहिला भाग निम्मा
3-4 थेंब वनीला इसेन्स
1 टे स्पून पिस्ता, बदाम व काजू (तुकडे करून)
2) चायना ग्रास रोस पूडिंग
दूसरा भाग निम्मा
2 टे स्पून रोस सीरप
सजवटीसाठी शुगर बॉलस
कृती: प्रथम दूध गरम करायला ठेवा. जर तुम्ही 1 लिटर दूध घेतले तर चायना ग्रास पावडर पूर्ण वापरा. ड्राय फ्रूटचे तुकडे करून घ्या.
दूध चांगले गरम झालेकी त्यामध्ये चायना ग्रास पावडर घालून चांगली मिक्स करून घ्या. पूर्ण विरघळली पाहिजे गठुल्या राहता कामा नये. मग 5 मिनिट मंद विस्तवावर दूध गरम करून घ्या. मिश्रण थोडे घट्ट होईल. मग विस्तव बंद करून मिश्रण थंड करायला ठेवा.
चायना ग्रास वनीला पूडिंग: मिश्रण थंड झाल्यावर त्याचे एकसारखे दोन भाग करा. एका भागामध्ये वनीला एसेन्स व थोडे ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घ्या. मग मिश्रण एका काचेच्या बाउलमध्ये किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये ओतून परत थोडे ड्रायफ्रूट घालून 30 मिनिट बाजूला सेट करायला ठेवा.
चायना ग्रास रोस पूडिंग: दुसर्या भागामध्ये 2 टे स्पून रोस सीरप घालून मिक्स करून मग मिश्रण एका काचेच्या बाउलमध्ये किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये ओतून 30 मिनिट बाजूला सेट करायला ठेवा.
मिश्रण सेट झाल्यावर फ्रीज मध्ये दोनी पूडिंग 2-3 तास थंड करायला ठेवा.
चायना ग्रास पूडिंग थंड झाल्यावर सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून शुगर बॉलसने सजवून घ्या.
The Recipe of this Video can be seen here : China Grass Rose Pudding & China Grass Vanilla Pudding For Kids