9 टरबूज सालीच्या सेवनाचे औषधी गुणधर्म फायदे व तोटे काय आहेत
9 Watermelon Rind Benefits
टरबूज हे सर्वांना आवडते. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आपण थंड टरबूज खाल्ले की आपल्याला एकदम थंड वाटते.
आपण टरबूज म्हणजेच कलिंगड आणतो. मस्त पैकी थंड करून खातो व त्याचे बाहेरील आवरण म्हणजेच त्याचे साल टाकून देतो. पण आपल्याला माहीत आहे का? टरबूजचे साल आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती हितावाह आहे. टरबूजच्या सलाचे गुणधर्म आपण पाहिले की आपण टरबूजची साल कधी सुधा टाकून देणार नाही.
टरबूजच्या सालावरील पांढरा भाग खूप गुणकारी आहे. त्याच्या सेवनाने काय काय फायदे होतात ते आपण बघूया.
टरबूजच्या सालामध्ये एंटीऑक्सीडेंट, खनिज, विटामिन भरपूर प्रमाणात असतात. कैलरी कमी प्रमाणात असतात पण विटामीन “A” विटामीन “C”, विटामीन “B 6, पोट्याशीयम, जिंक असते.
1) टरबूजच्या सालीचे सेवन केल्याने आपली त्वचा निरोगी राहते. कारणकी त्याच्यामध्ये विटामिन “A” भरपूर प्रमाणात आहे.
2) ब्लड प्रेशर नियंत्रनात राहते. जर आपले ब्लड प्रेशर वाढले असेल तर टरबूजचे साल म्हणजेच पांढरा भाग खल्ला पाहिजे. कारण की त्यामध्ये पोट्याशीयम भरपूर प्रमाणात आहे तसेच आपल्या छोट्या रक्त वाहिन्याना मोठ्या करण्याचे काम करते व रक्त वाहिन्यावर ताण किंवा दबाव कमी करण्याचे काम करते. त्यामुळे स्ट्रोक येत नाही.
3) टरबूजच्या सालामध्ये विटामिन “C” भरपूर आहे त्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ति वाढते.
4) टरबूजच्या सालीमध्ये कमी कॅलरी आहेत तर त्याच्या सेवनाने शरीराचे वजन नियंत्रीत राहते. टरबूजच्या एका सालाच्या सेवनाने शरीरातील फेट कमी करते व सारखे सारखे खाण्याची इछा होत नाही.
5) टरबूजच्या सालामध्ये लाईकोपिन आहे त्यामुळे शरीरातील गाठी किंवा सूज कमी होते.
6) टरबूज च्या सालीचे सेवन हे गर्भवती महिलासाठी लाभदायक आहे. त्यामुळे मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी होतो. गर्भावस्थामध्ये येणारी सूज कमी होते.
7) किडनी स्टोनचा ज्यांना त्रास होतो त्यांनी टरबूजच्या सालाचे सेवन करावे.
8) टरबूजच्या सालामध्ये लाईकोपिन असते त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर च्या त्रासापासून लढन्यासाठी मदत करते.
9) टरबूजच्या सालीचे सेवन केल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते.
टरबूजचे सेवन प्रमाणाच्या बाहेर केलेकी पोट बिघडण्याच्या संभव आहे.
टरबूजचे असे आहेत औषधी गुणधर्म
The Marathi language video of this article can be seen on our YouTube Channel – 9 Benefits of Using Tarbuz / Watermelon Rinds