आंबट गोड कच्च्या कैरीची जेली मुलांसाठी रेसिपी
जेली हा पदार्थ मुलांना अगदी खूप आवडतो. कैरी पासून आपण जेली बनवू शकतो. कैरीची जेली छान आंबट गोड अशी लागते. तसेच आकर्षक दिसते.
कैरीची जेली बनवतांना तोतापूरी कैरी वापरली आहे कारण की तोतापूरी आंब्याची कैरी जास्त आंबट नसते. कैरीची जेली बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. त्यापासून आपल्या शरीराला विटामीन “सी” मिळते.
The Video of this Recipe can be seen here: Ambat God Raw Mango Jelly
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 8-9 पिसेस
साहीत्य:
1 मध्यम आकाराची तोतापूरी आंब्याची कैरी
1/2 कप साखर
2 टी स्पून कॉर्नफ्लौर
खायचा हिरवा रंग
1 टी स्पून तूप प्लेटला लावायला
1/4 कप डेसिकेटेड कोकनट सजवटीसाठी
कृती: प्रथम कैरीची साल काढून चिरून घ्या. मग मिक्सरच्या भांड्यात ग्राइंड करून घ्या.
जाड बुडाची कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये ग्राइंड केलेली कैरीचा गर काढून 1/2 कप साखर घालून शिजवायला ठेवा.
एका वाटीत कॉर्नफ्लोर व दोन चमचे पाणी घालून मिक्स करून घ्या. मग कैरीच्या मिश्रणात घालून मिक्स करून परत घट्ट होई पर्यन्त ठेवा. मिश्रण घट्ट झाले की त्यामध्ये 2-3 थेंब हिरवा रंग घालून मिक्स करून एक मिनिट गरम करून विस्तव बंद करा.
एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून मिश्रण प्लेटमध्ये काढून एकसारखे करून घ्या. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या.
एका प्लेटमध्ये डेसिकेटेड कोकनट घेवून एक वडी घेवून डेसिकेटेड कोकनटमध्ये घोळून मग बाजूला ठेवा, अश्या प्रकारे सर्व वड्या घोळून एका प्लेटमध्ये काढून घ्या. मग सर्व्ह करा.