लॉक डाऊन भाजी नाही औथेंटिक राजस्थानी आटा चक्की भाजी बनवा सगळे आवडीने खातील
पारंपारिक राजस्थानी आटा चक्की भाजी रेसिपी
आता सध्या भारतभर लॉक डाऊन चालू आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या भाज्या मिळत नाही व ज्या भाज्या आहेत त्या खाऊन कंटाळा आला आहे.
आपण आज राजस्थान मधील जोधपुर ह्या भागातील पारंपारिक आटा चक्की भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. आटा चक्की भाजी म्हणजे आपण गहू चक्की मधून दळून आणतो तो आटा आपण भिजवून त्यातील गूटन काढून त्याची अगदी चविस्ट चमचमीत अशी भाजी ग्रेव्ही बनवणार आहोत.
पारंपारिक राजस्थानी आटा चक्की भाजी आपण पराठा किंवा चपाती बरोबर सर्व्ह करू शकतो.
साहीत्य:
1 कप गव्हाचे पीठ
मीठ चवीने
तेल चिकी तळण्यासाठी
ग्रेव्ही साठी:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
2 लवंग
1 छोटा दालचीनी तुकडा
7-8 मिरे
1 तमालपत्र
1/2 टी स्पून मेथ्या दाणे
1 मोठ्या आकाराचा कांदा (बारीक चिरून)
1 टे स्पून आले-लसूण पेस्ट
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून गरम मसाला
2 टे स्पून दही
1 टी स्पून कसूरी मेथी
मीठ चवीने
2 टे स्पून सुके खोबरे (किसून)
1 टे स्पून काजू
2 टे कोथबिर सजावटीसाठी
कृती:
प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, मीठ व थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. पीठ मळल्यावर एका भांड्यात मळलेले पीठ घेवून त्यामध्ये पीठ बुडेल इतके पाणी घालून अर्धा तास बाजूला ठेवा. अर्धा तास झाल्यावर त्यातील पाणी बदलून दुसरे स्वछ पाणी घालून परत अर्धा तास भिजत ठेवा. ही क्रीय आपल्याला दोन वेळा करायची आहे. अर्धा तास झाल्यावर पाणी काढून पीठ 15 मिनिट निथळत ठेवा. नंतर त्याचे मध्यम आकाराचे तुकडे कापून घ्या.
कांदा बारीक चिरून घ्या. आले-लसूण पेस्ट बारीक करून घ्या. कोथबिर चिरून घ्या. किसलेले खोबरे व काजू कोरडे भाजून बारीक वाटून घ्या.
कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये पिठाचे गोळे छान कुरकुरीत होई पर्यन्त तळून घ्या.
त्याच कढईमद्धे 1 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये जिरे, लवंग, दालचीनी, मिरे, तमालपत्र घालून फोडणी करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. आल-लसूण परतून झाल्यावर दही घालून, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने-जिरे पावडर, कसूरी मेथी घालून मिक्स करून तेल सुटे पर्यन्त परतून घ्या.
मग त्यामध्ये तळलेली चिकी घालून थोडे परतून 1 कप पाणी घालून उकळी आणा. आता परत हवे तसे म्हणजे 1/2 ते 1 कप पाणी घालून सुके खोबरे- काजू पेस्ट व मीठ चवीने घालून मिक्स करून मंद विस्तवावर झाकण ठेवून 8-10 मिनिट शिजवून घ्या. कोथबिरने सजवा.
गरम गरम औथेंटिक राजस्थानी आटा चक्की भाजी चपाती किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.
The Recipe of this Video can be seen here: Traditional Rajasthani Tasty Spicy Atta Chakki Bhaji Or Gravy