मुलांसाठी दोन प्रकारचे पौस्टीक लाडू आंबा नारळ व बोर्नविटा नारळ लाडू
आंबा हा मधुर व आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. आंब्याचा रसा पासून आपण नानाविध पदार्थ बनवू शकतो. आंबा नारळ लाडू हे मस्त स्वीट डिश म्हणून बनवता येतात.
बोर्नविटा नारळ लाडू हे मुलांना खूप आवडतात. बोर्नविटा हे मुलांचे आवडतीचे ड्रिंक आहे. त्यापासून आपण लाडू बनवू शकतो. खूप टेस्टी लागतता.
आंबा व बोर्नविटा लाडू मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला किंवा नाश्त्याला द्यायला पण मस्त आहे.
आंबा-नारळ लाडू (Mango Naral Ladu): आंबा हा फळांचा राजा आहे त्याचा रंग व मधुर सुगंध आपल्याला मोहात पाडतो. तसेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे.
आंबा नारळ लाडू हे मुलांसाठी बनवायला फार छान आहेत. तसेच ते बनवायला सोपे व लवकर होणारे आहेत. आंबा हा फक्त सीझनमध्ये मिळतो. त्यामुळे आंब्याचा रस हा टीन मधला वापरला तरी चालेल. हे लाडू उपासाला सुद्धा चालतात.
साहित्य :
१ नारळ (खोवून)
१ कप दुध
१ कप साखर
१ कप हापूस आंब्याचा रस
१ टी स्पून वेलचीपूड
कृती:
एका कढई मध्ये खोवलेला नारळ, दुध घालून १०-१५ मिनिट मंद विस्तवावर शिजत ठेवा. मग त्यामध्ये साखर, आंब्याचा रस घालून परत शिजत ठेवा. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यामध्ये वेलचीपूड घालून मिक्स करा. थोडे थंड झाल्यावर त्याचे लाडू वळा.
बोर्नविटा कोकनट लाडू:
बोर्नविटा हे ड्रिंक म्हणजे मुलांचे अगदी आवडतीचे ड्रिंक आहे. कोकनट लाडू हा अजून एक लाडूचा मस्त प्रकार आहे. लाहान मुलांना अश्या प्रकारचे लाडू नाश्त्याला किंवा दुपारी दुधा बरोबर सर्व्ह करायला मस्त आहेत किंवा डब्यात द्यायला सुद्धा छान आहेत. तसेच ते पौस्टीक सुद्धा आहेत.
बोर्नविटा कोकनट लाडू:
साहीत्य:
1 नारळ ओला (खाऊन)
1 कप दूध
1 कप साखर
2 टे स्पून बोर्नविटा
1 टी स्पून वेलची पावडर
कृती:
ओला नारळ खाऊन घ्या. एका कढईमद्धे दूध, साखर व ओला नारळ मिक्स करून मिश्रण विस्तवावर गरम करायला ठेवा. दूध व नारळाचे मिश्रण घट्ट झाले की त्यामध्ये बोर्नविटा व वेलची पावडर घालून मिक्स करा. मग त्यापासून लाडू बनवा.
The Video of this Recipe can be seen here: For Kids Healthy Mango Coconut & Bournvita Ladoo