How To Make Bengali Mithai Cham Cham In A Different Way With Suji And Coconut
लॉकडाउनमध्ये बनवा बंगाली डिलिशीयस रवा कोकोनट चमचम बिना पनीर व मावा अगदी निराळ्या प्रकारे रेसिपी
चमचम ही एक बंगाली मिठाई आहे हे आपल्याला माहीत आहेच. चमचम आपण दुधाचा छाना बनवून बनवतो. एमजी त्यामध्ये मावाचे सारण बनवून त्याला सजवतो.
आता आपण चमचम ही मिठाई अगदी वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत. चमचम बनवतना बारीक रवा, दूध व डेसिकेटेड कोकोनट वापरुन बनवले आहे. दिसायला अगदी आकर्षक व टेस्टी सुद्धा लागते.
साहीत्य:
1 कप बारीक रवा
1 1/2 कप दूध
1 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
1 टे स्पून मिल्क पावडर
1 टे स्पून पिठीसाखर
3-4 थेंब ऑरेंज कलर
चमचम सजवटीसाठी:
1 टे स्पून ड्राय फ्रूट
1/4 कप डेसिकेटेड कोकनट
पाक बनवण्यासाठी:
1 कप पाणी
3/4 कप साखर
1/2 टी स्पून वेलची पावडर
कृती:
कढई गरम करून घ्या. मग त्यामध्ये बारीक रवा घालून मंद विस्तवावर 5 मिनिट भाजून घ्या. रवा भाजताना आजिबात लाल किंवा काळपट होता कामा नये.
दुसर्या एका कढईमद्धे साखर व पाणी मिक्स करून पाक बनवायला ठेवा. पाक दोन तारी बनवायचा आहे.
रवा भाजून झाल्यावर त्यामध्ये हळू हळू दूध घालून रवा शीजवून घ्या. मग शिजलेला रवा प्लेटमध्ये काढून घ्या. हाताला थोडे तूप लावून रवा चांगला मळून घेवून त्यामध्ये 1 टे स्पून डेसिकेटेड कोकनट, 1 टे स्पून पिठी साखर, 1 टे स्पून मिल्क पावडर घालून परत चांगले मळून घ्या.
त्याचे दोन भाग करून एक भाग पंढरा ठेवा व दुसर्या भागामध्ये ऑरेंज कलर घालून मिक्स करून घ्या. मग त्याचे छोटे छोटे लांबट गोळे बनवा.
दोन तारी पाक तयार झालकी त्यामध्ये बनवलेले गोळे ठेवून कढईवर एक मिनिट झाकण ठेवा. एक मिनिट झाल्यावर झाकण काढा व गोळे उलट करून घ्या. परत गोळे 2-3 मिनिट तसेच पाकात शीजू द्या. अश्या प्रकारे सर्व गोळे शिजवून घ्या.
मग पाकातील गोळे एका प्लेटमध्ये काढून घ्या. एका छोट्या प्लेटमध्ये डेसिकेटेड कोकनट घेवून त्यामध्ये प्रतेक गोळा रोल करून प्लेटमध्ये ठेवा. वरतून ड्रायफ्रूटने सजवा. सजवलेले चम चम सर्व्ह करा.
The video in Marathi of this same Cham Cham Preparation can be seen here – How to Make Delicious Cham Cham at Home