5 मिनिटात बनवा होम मेड किसमिस द्राक्षापासून मग वर्षभर खात रहा
आता उन्हाळा आहे द्राक्षाचा सीझन आहे व द्राक्ष थोडी स्वस्त सुद्धा आहेत. द्राक्षा पासून आपण घरच्या घरी किसमिस बनवू शकतो. किसमिस आपण पाच मिनिटात बनवू शकतो. व वर्षभर साठवून ठेवू शकतो.
द्राक्षा मध्ये जे गुण असतात तेच गुण किसमिस मध्ये सुद्धा असतात. किसमिसमध्ये आयरन, पोटेशियम, कैल्शियम, मैग्नीशियम व फाइबर असते. किसमिसच्या सेवनाने वजन वाढण्यास मदत होते. हाडे मजबूत बनतात. एंटी-ऑक्सीडेंट गुण आहेत त्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते.
द्राक्षा पासून किसमिस बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट होतात.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 300 ग्राम बनतात
साहीत्य:
1 किलो ग्राम पिकलेली द्राक्ष
5-6 मोठे ग्लास पाणी
कृती:
सर्व प्रथम द्राक्ष स्वच्छ धुवून घ्या. मग एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात 5-6 ग्लास पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाले की त्यामध्ये धुतलेली द्राक्षे घालून शीजवून घ्या.
आपल्याला द्राक्षे खूप शिजवायची नाही फक्त पाणी चांगले गरम झाले की सर्व द्राक्ष वरती तरंगू लागतील. सर्व द्राक्ष वरती तरंगायला लागली की विस्तव बंद करायचा.
एक मोठ्या आकाराची चाळणी घेवून त्यामध्ये द्राक्ष ओतून घ्यायची पाणी निघून गेल्यावर 5-7 मिनिट द्राक्ष थंड होऊ द्या.
मग एक मोठी स्टीलची प्लेट किंवा ताट घेवून त्यावर स्वच्छ पातळ कापड पसरून ठेवा. मग त्या कापडावर सर्व द्राक्ष पसरून ठेवा. सर्व द्राक्ष मोकळी ठेवा एकावरएक ठेवायची नाही.
मग द्राक्षाचे ताट उन्हात ठेवा. आपल्याला साधारणपणे 2 दिवस तरी द्राक्ष उन्हात सुकवावी लागतील. द्राक्ष सुकली की हवाबंद डब्यात भरून ठेवा व आपल्याला वर्षभर वापरता येतात.
The Marathi Language Video of Prepare Raisins or Kishmish within 5 minutes can be seen here: Make Fresh Raisins at Home