फ्रूटीचे दोन प्रकार इन्स्टंट मॅंगो फ्रूटी व टिकाऊ मॅंगो फ्रूटी मुलांसाठी
मॅंगो फ्रूटी म्हंटले की मुलांचे अगदी आवडतीचे पेय आहे. आता उन्हाळा चालू झाला आहे. शाळांना सुट्यापण आहेत रोज दुपारी मुलांना काहीतरी थंड हवे असते तर आपण मॅंगो फ्रूटी घरच्या घरी काही सुद्धा प्रिजर्वेटिव न टाकता बनवता येते. TV वर मॅंगो फ्रूटी फ्रेश अँड ज्युसी ही जाहिरात बघीतली की मुले खुश होतात.
इन्स्टंट मॅंगो फ्रूटी: इन्स्टंट मॅंगो फ्रूटी ही आपण बनवून लगेच संपवायची आहे. इन्स्टंट मॅंगो फ्रूटी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. लहान मुले सुद्धा बनवू शकतात.
टिकाऊ मॅंगो फ्रूटी: मॅंगो फ्रूटीहे 10-15 दिवस फ्रीजमध्ये छान राहते. टिकाऊ मॅंगो फ्रूटी हे बनवायला अगदी सोपे आहे व झटपट होणारे आहे. टिकाऊ मॅंगो फ्रूटी बनवतांना कोणतेही प्रिजर्वेटिव न टाकता बनवता येते.
इन्स्टंट मॅंगो फ्रूटी साहीत्य:
3/4 कप मॅंगो पल्प
1/2 टे स्पून पिठी साखर
1/2 टे स्पून लेमन ज्यूस
1 कप पाणी
सजावटीसाठी: मॅंगो स्लाईस, आइस
इन्स्टंट मॅंगो फ्रूटी कृती:
एका भांड्यात मॅंगो पल्प, पिठी साखर, लेमन ज्यूस, पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या. मग एका काचेच्या ग्लासमध्ये मॅंगो ज्यूस ओतून वरतून मॅंगोच्या स्लाईस व आइस क्युब घालून थंड गार सर्व्ह करा.
टिकाऊ मॅंगो फ्रूटी साहीत्य:
2 मोठ्या आकाराचे पिकलेले आंबे
1 मध्यम आकाराची कच्ची कैरी
3/4 कप साखर
4 1/2 कप पाणी
सजावटीसाठी: मॅंगो स्लाईस, आइस
टिकाऊ मॅंगो फ्रूटी कृती:
प्रथम आंबे व कैरी धुवून पुसून घ्या. मग त्याची साले काढून फोडी कापून घ्या. आंब्याच्या फोडी व कैरीच्या फोडी वेगवेगळ्या ठेवा. आंब्याच्या फोडी व कैरीच्या फोडी मिक्सरमध्ये ब्लेण्ड करून घ्या.
एका जाड बुडाच्या कढईमद्धे आंब्याचा ब्लेण्ड केलेला ज्यूस काढून घ्या. मग त्यामध्ये कैरीच्या पण ज्यूस घालून मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. मिश्रण चांगले गरम होवून उकळी यायला लागली की त्यामध्ये साखर घालून मिक्स करून घ्या. मिश्रण आपल्याला अगदी पारदर्शक होई पर्यन्त गरम करायचे आहे.
मिश्रण पारदर्शक झाले की विस्तव बंद करून कढई खाली उतरवून थंड करायला ठेवा.
मिश्रण थंड झाले की गाळून घ्या. मग त्यामध्ये चार कप थंड पाणी घालून ग्लासमध्ये ओतून घ्या.
थंड थंड मॅंगो फ्रूटी सर्व्ह करा. सर्व्ह करताना वरतून आईस व मॅंगोचे बारीक तुकडे घाला.
The Marathi language video of these Frooti recipes can be seen here – 2 Types of Mango Frooti for Children