इन्स्टंट झटपट चटपटा कैरीचा छुन्दा
उन्हाळा आला की कैरीचा आंब्याचा सीझन चालू होतो. मग आपण कैरीचे विविध पदार्थ बनवतो त्यामधील काही पदार्थ टिकाऊ किंवा काही पदार्थ झटपट बनवून संपवायचे. कैरीचे पदार्थ हे छान आंबट गोड लागतात व जेवणात असे पदार्थ असले तर तोंडाला चांगली टेस्ट पण येते.
कैरीचा छुन्दा आपण वर्षभरासाठी सुद्धा बनवतो पण त्यासाठी आपल्याला छुन्दा बनवून झाला की 10 दिवस वाट पहावी लागते. त्यापेक्षा आपण झटपट इन्स्टंट कैरीचा छुन्दा बनवू शकतो अगदी सेम त्याच टेस्टचा लागतो.
कैरीचा छुन्दा ही खर म्हणजे गुजरात ह्या प्रांतातील पदार्थ आहे. पण कालांतराने तो भारत भर लोकप्रिय झाला आहे. कैरीचा इन्स्टंट छुन्दा कसा बनवायचा ते ह्या विडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दिले आहे. बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडेल.
साहीत्य:
500 ग्राम कैरी किंवा 2 कप कैरीचा कीस
250 ग्राम साखर किंवा 1 कप साखर
250 ग्राम गूळ किंवा 1 कप गूळ
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून जिरे पावडर (भाजून कूट करून)
1/2 टी स्पून हळद
1 टी स्पून काळे मीठ
मीठ चवीने
कृती:
प्रथम कैरी धुवून सोलून किसून घ्या. मग एका जाड बुडाच्या कढईमद्धे कैरीचा कीस, साखर, गूळ घालून मिस्क करून थोडे घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या. साखरेचा पाक एक तारी होई पर्यन्त आटवून घ्यावे.
मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, काळे मीठ, मीठ चवीने घालून मिक्स करून मिश्रण थंड करायला ठेवा.
कैरीचा छुन्दा थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा. अश्या प्रकारचा कैरीचा छुन्दा आपण चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करू शकतो.
The Marathi Language Video of this recipe can be seen here: Instant Zatpat Tasty Kairichya Chunda