स्वप्नविचार | शुभ स्वप्न | अशुभ स्वप्न | स्वप्नफलदेशकाल
आज आपण ह्या नवीन विषयावर माहीती बघणार आहोत.
आपल्याकडे पूर्वी पासून म्हंटले जाते की मनी असे ते स्वप्नी दिसे. हे काही अंशी बरोबर सुद्धा आहे कारण की बर्याच वेळा आपण दिवसभर एकाच विषयावर विचार करतो त्यमुळे रात्री झोपताना सुधा आपण त्याच विचारामध्ये असतो त्यामुळे जे आपले मनातील विचार आहेत ते आपल्याला स्वपामध्ये दिसतात.
आपली स्वप्न ही आपल्याला काही शुभ संकेत देतात. शुभ स्वप्न मध्ये आपल्याला कोणती स्वप्न दिसतात त्यावर त्याचे फल अवलंबून असते. तसेच अशुभ स्वप्न मध्ये कोणत्या प्रकारचे स्वप्न आहे त्याचे पण काय फल आहे. तसेच स्वप्नफलदेशकाल म्हणजे ते कोणत्या प्रहर मधील स्वप्न आहे त्यावर त्याचा काल अवलंबून असतो.
शुभ स्वप्न:
1) वीणावादन, नौकेत बसणे, आपल्या शरीरातून रक्त गळत असलेले पाहणे, पाण्याने स्नान करणे, आपला मृत्यू, धान्य, गाय, म्हैस, दूर्वा असलेल्या जमिनीवर चालणे, पिता-माता व मित्र ह्याचे दर्शन होणे ही स्वप्ने आनंदजनक आहेत.
2) निरभ्र आकाश, स्वतः चालणे, पूलावरून न अडखळता पुढे जाणे, प्रेत दर्शन, मेजवानीचा समारंभ पाहणे, घर बांधणे, जिना चढणे किंवा उतरणे, गायन वादन आईकणे, पशुचा समुदाय पाहणे या स्वप्नानी त्वरीत कार्यसिद्धी होते.
3) मुंग्या पाहणे. स्वतः उत्तम पोशाख केलेला पाहणे, धान्य कापड ह्याची खरेदी पाहणे, किल्ला अश्या प्रकारची शुद्ध स्वप्ने पाहणे शुभ सूचक होय.
4) कापूस, भस्म, भात, ताका पासून बनवलेले पांढरे पदार्थ पाहणे, गाय, देव, ब्राह्मण, हत्ती, यापासून इतर काळे पदार्थ पाहणे हे वाईट समजावे.
5) तलाव, नदी समुद्र हयातून तरुण जाणे किंवा पाहणे, चंद्र अथवा सूर्याची मंडळे पाहणे, मोठा राजवाडा पाहणे, विष्ठा अंगास लागणे, रक्ताचे स्नान होणे, दहिभाताचे भोजन, खीर पिणे, मास खाणे, पांढरे वस्त्र , फुले, गंध, अंलकार पाहणे, अश्या स्वप्नानी मानसन्मान प्राप्त होतो.
6) एखाद्या माणसाचा मृतू स्वप्नात पाहिला असता त्या माणसाला आरोग्य प्राप्त होते व त्याची आयुष वाढते.
अशुभ स्वप्ने:
1) मध माश्यांना उडताना पाहणे, भूमीवरील द्रव्य गोळा करणे, बंदुकीचा आवाज आईकणे, हातात चाकू घेणे, ही स्वप्ने दुखमुलक असतात.
2) पळस, वारूळ, कडूनिंबावर चढणे, तेल, लोखंड, कापूस, यांची प्राप्ती होणे, ही स्वप्ने शरीराला पीडा देतात.
3) लग्न किंवा घड्याळ बंद पडलेले पाहणे ही स्वप्ने कोणाची तरी मृत्यूवारता कळण्याचे सूचक आहे.
4) कोळसे, तांबडे वस्त्र, तांबड्या फुलांच्या माळा, आकाशातून तारे पडणे, तूप तेल अंगास लावणे, केस गळणे, दात पडणे, कुत्रा, गाढव, उंट, डुकर यांचे दर्शन होणे पाण्यात किंवा चिखलात बुडणे, ह्या गोष्टी स्वपात पाहिल्या असता धन हानी , संकट व शरीराला क्लेशकारक होतात.
5) हजामत करणे, नखे काढणे, पक्वानाचे भोजन करणे, काळे पुरुष पाहणे, अमंगळ व काळे वस्त्र नेसलेली स्त्री आलिंगन देणे, कोणाचे तरी पत्र येणे, श्राद्ध अथवा पीडदान करणे, हसणे, रागावणे, झोपल्यावर झोके घेणे, ढग आलेले पाहणे, ही स्वपे हानिकारक आहेत.
स्वप्न फला देशकाल:
रात्रीच्या पहिल्या प्रहारात पडलेले स्वप्न एक वर्षाने फलदायक होते.
दुसर्या प्रहरात पडलेले स्वप्न आठ महिन्यांनी पूर्ण होते.
तिसर्या प्र्हरात पडलेले स्वप्न तीन महिन्यांनी फल देते.
चौथ्या प्रहरात पडलेले स्वप्न एका माहित्यात फल देते.
अरुणोदयी पडलेले स्वप्न 10 दिवसात फल देते.
सूर्योद्याच्या वेळी पडलेले स्वप्न तत्काल फल देते.
The Video of this Article can be seen here: स्वप्नविचार शुभ स्वप्न अशुभ स्वप्न स्वप्नफलदेशकाल