लॉकडाउन मध्ये बनवा हेल्दि न्यूट्रिशियस टेस्टी सूजी व बेसनचा नाश्ता
आता भारतभर लॉकडाउन चालू आहे त्यामुळे घरातील सर्व मेंबर्स घरी आहेत. रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचे तो प्रश्न आहे. रोज तोच तोच ब्रेकफास्ट करून कंटाळा आला आहे. चला तर मग आपण एक निराळा नाश्ता सर्वांना आवडेल असा टेस्टी व हेल्दिसुद्धा असा नाश्ता बनवू या.
सुजी म्हणजेच रवा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या घालून छान हेल्दि नाश्ता बनवू शकतो. सुजी चा नाश्ता बनवतना गाजर, शिमला मिर्च, कांदा, कोथबिर, पुदिना वापरला आहे व मस्त पैकी शालोफ्राय केला आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1/2 कप बारीक रवा
1/2 कप बेसन
1/4 टी स्पून हळद
1 3/4 कप पाणी
1 टे स्पून तेल
1/2 टी स्पून ओवा
1/4 टी स्पून हिंग
1 टे आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1/2 टी स्पून चाट मसाला. 1 टी स्पून लिंबुरस
1/2 टी स्पून चिली फ्लेस्क
1 छोटा कांदा (चिरून) , 1 छोटे गाजर (चिरून)
1 छोटी हिरवी-लाल-पिवळी शिमला मिर्च (चिरून)
1/4 कप कोथबिर (चिरून),2 टे स्पून पुदिना (चिरून)
मीठ चवीने
तेल शालोफ्राय करण्यासाठी
कृती: कांदा, शिमला मिर्च, गाजर, कोथबिर व पुदिना बारीक चिरून घ्या. आले-लसूण-हिरवी मिरची वाटून घ्या.
एका बाउल मध्ये रवा, बेसन, हळद, मीठ व 1 3/4 कप पाणी घालून मिक्स करून बाजूला ठेवा.
एका कढईमद्धे 1 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये ओवा, आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. मग त्यामध्ये रवा बेसनचे मिश्रम घालून मिक्स करून घेवून मंद विस्तवावर घट्ट होईपर्यन्त शिजवून घ्या. मिश्रण घट्ट झालेकी एका बाउलमध्ये काढून घ्या. थंड झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, गाजर, शिमला मिर्च, लाल मिरची पावडर, गरम मसाला, चाट मसाला, मीठ,, कोथबिर, पुदिना, लिंबुरस घालून मिक्स करून घ्या.
एका स्टीलच्या प्लेटला तेल लावून त्यामध्ये मिश्रण एकसारखे थापून घेवून फ्रीजरमध्ये 1 तास सेट करायला ठेवा. सेट झाले की बाहेर काढून एका राऊंड कटरनि गोल गोल चाकत्या कापून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर तेल लावून बनवलेल्या गोल चकत्या ठेवा बाजूनी परत थोडे तेल सोडून दोनी बाजूंनी छान कुरकुरीत शालो फ्राय करून घ्या.
गरम गरम नाश्ता टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of this recipe can be seen here – Healthy and Nutritious Suji Besan Snack / Dish during Lockdown