महाराष्ट्रियन सारस्वत स्टाईल चमचमीत मोड आलेल्या हरभऱ्याची आमटी
आपण मोड आलेल्या हरभऱ्याची उसळ बनवतो पण मोड आलेल्या हरभऱ्याची आमटी आपण बनवली आहे का? बनवून बघा नक्की सर्वांना आवडेल. मोड आलेल्या हरभऱ्याची आमटी ही कोकण ह्या भागातील सारस्वत लोक बनवतात.
मोड आलेले हरभरे सोलून ओल्या नारळाचे वाटण करून आमटी बनवून त्यामध्ये काजू घालून आमटी फार चवीस्ट लागते. गरम गरम भाता बरोबर अश्या प्रकारची आमटी फार सुरेख लागते.
साहीत्य:
1 कप मोड आलेले हरभरे (सोलून)
1 छोटा बटाटा (सोलून, चिरून)
7-8 काजू (तुकडे करून)
1/2 टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
1 टे स्पून कोथबीर (चिरून)
1 आमसुल
मसाला वाटण करीता:
1 टे स्पून तेल
1 छोटासा कांदा (चिरून)
7-8 लसूण पाकळ्या
1/2” आले तुकडा
1 कप ओला नारळ (खोवून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
कढईमद्धे तेल गरम करून कांदा, आले-लसूण परतून ओला नारळ थोडा परतून लाल मिरची घालून गरम करून घ्या. मग थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या.
आमटी फोडणी करीता:
1/2 टे स्पून साजूक तूप
1 टे स्पून कांदा (बारीक चिरून)
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
कृती:
प्रथम हरभरे भिजवून त्याला मोड आणून घ्या. मोड आल्यावर ते सोलून घ्या.
आपण जेव्हा कुकर लावतो तेव्हा भाता दुसर्या भाड्यात थोडे पाणी घालून हरभरेपण शिजवून घ्या.
मसाला बनवताना: कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा , लसूण व आले घालून थोडे परतून घ्या मग त्यामध्ये ओला नारळ घालून 2 मिनिट परतून घ्या. नारळ परतून झालाकी त्यामध्ये लाल मिरची पावडर घालून थोडी परतून विस्तव बंद करा. थंड झाल्यावर थोडे पाणी घालून मसाला चांगला बारीक वाटून घ्या.
आमटी बनवण्यासाठी: कढईमद्धे तूप गरम करून त्यामध्ये हिंग व कांदा घालून थोडा परतून घ्या. मग त्यामध्ये बटाटा सोलून चिरून घाला बटाटा थोडा परतून झाला की त्यामध्ये काजू व हळद घालून शिजवलेले हरभरे थोडे कुस्करून घाला. वाटलेला मसाला घालून पाणी घाला. पाणी घालताना आपल्याला आमटी जेव्हडी पातळ किंवा घट्ट जशी हवी असेल त्यानुसार पाणी घाला. मग त्यामध्ये गरम मसाला, मीठ चवीने घालून चांगली उकळी आणा म्हणजे मसाला चांगला शिजेल नाहीतर मसाला कच्चा राहील व आमटी छान खमंग लागणार नाही.
आमटीला उकळी आली की त्यामध्ये आमसुल व कोथबिर घालून मिक्स करून गरम गरम भाता बरोबर हरभऱ्याची आमटी सर्व्ह करा.
The Video of this recipe can be seen here: Traditional Mod Alelya Harbharyachi Amti