महाराष्ट्रियन कोकणी स्टाईल पारंपारिक आंबटगोड कैरीचा गुळांबा
कैरी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. कैरीमध्ये विटामीन “C” असते. कैरीच्या सेवनाने आपल्या शरीराला थंडावा मिळतो. कैरीमध्ये आयरन, सोडियम क्लोराइड आहे.
कैरीच्या गुळांबा हा आंबटगोड लागतो त्यामुळे तोंडाला छान टेस्ट येते. गुळांबा बनवायला अगदी सोपा आहे. लहान मुले अगदी आवडीने खातात. कोकण ह्या भागात कैरीचा गुळांबा फार लोक्प्रीय आहे.
कैरीचा गुळांबा चपाती, पराठा किंवा ब्रेड ला लावून सुधा सर्व्ह करता येतो.
साहीत्य:
500 ग्राम आंबट कैरी किंवा 1 1/4 कप कैरी कीस
500 ग्राम गूळ किंवा 1 कप गूळ (चिरून)
1 टी स्पून वेलची पावडर
1 चिमुट मीठ
1 टी स्पून लाल मिरची पावडर
कृती:
कैरी चांगली धुवून सोलून किसून घ्या. गूळ चिरून घ्या.
एका जाड बुडाच्या भांड्यात किसलेली कैरी घेवून त्यामध्ये गूळ घालूम मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. गूळ विरघळला की मिश्रण घट्ट होऊ लागेल. मिश्रण खूप घट्ट होऊ द्यायचे नाही . मिश्रण थोडे घट्ट झाले की त्यामध्ये मीठ, वेलची पावडर व लाल मिरची पावडर घालून मिस्क करून विस्तव बंद करून भांडे थंड करायला ठेवा.
कैरीचा गुळांबा थंड झालाकी काचेच्या बाटलीत भरून ठेवा. कैरीचा गुळांबा चांगला वर्षभर टिकतो.
कैरीचा गुळांबा आपण चपाती, पराठा किंवा ब्रेड बरोबर सर्व्ह करू शकतो..
The Marathi language Video of this recipe can be seen here: Maharashtrian Kokani Style Tasty Ambat god Kairicha Gulamba