महाराष्ट्रियन पारंपारिक खमंग दाल ढोकळी वरणफळ चकोल्या
महाराष्ट्रामध्ये दाल ढोकळी ही फार पूर्वी पासून बनवण्यात येणारी डिश आहे. त्यालाच वरणफळ किंवा चकोल्या असे सुद्धा म्हणतात. दाल ढोकळी ही डिश वन डिश मिल म्हणून सुद्धा बनवता येते. त्याच्या बरोबर दुसरे काही नाही केले तरी चालते.
वरण फळ ही डिश बनवायला अगदी सोपी आहे. व झटपट होणारी आहे तसेच त्याची टेस्ट खमंग लागते. दाल ढोकळी ही टेस्टला छान आंबट-गोड-तिखट अशी लागते.
चाकोल्या ह्या साजूक तूप घालून भाजलेल्या किंवा तळलेल्या पापडा बरोबर व लोणच्या बरोबर सर्व्ह करा.
बनवण्यासाठी वेळ: 40 मिनिट
वाढणी: 2 जणासाठी
साहीत्य:
आमटी व फोडणी करीता:
1/2 कप तुरीची डाळ (शिजवून)
1 टे स्पून तूप
1/2” आले तुकडा (किसून)
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
1-2 हिरव्या मिरच्या (चिरून)
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
5-6 कडीपत्ता पाने
2 आमसुल किंवा 1 टी स्पून लिंबूरस
मीठ व साखर चवीने
1 कप गव्हाचे पीठ
2 टे स्पून बेसन
1/4 टी स्पून लाल मिरची पावडर
1/8 टी स्पून हळद
1/2 टी स्पून ओवा
1 टे स्पून तेल गरम
मीठ चवीने

कृती:
प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, बेसन, लाल मिरची पावडर, हळद, ओवा, मीठ व थोडे पाणी वापरुन घट्ट पीठ मळून घेवून 15 मिनिट झाकून बाजूला ठेवा. तुरीची डाळ कुकरमध्ये छान शीजवून घ्या.
पीठ चांगले भिजल्यावर त्याचे एक सारखे दोन गोळे करून लाटून त्या शंकरपाळी सारख्या कापून घेवून एका प्लेट मध्ये काढून घ्या.
एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून जिरे, हिंग,आले, कडीपत्ता पाने, हिरव्या मिरच्या, लाल मिरची पावडर, हळद घालून मिक्स करून त्यामध्ये शिजलेली तुरीची डाळ व 2 1/2 कप पाणी घालून चवीने मीठ घालून चांगली उकळी आणा.
आमटीला चांगली उकळी आलीकी त्यामध्ये कोथबिर व कापून ठेवलेल्या शंकरपाळया घालून मिक्स करा. एमजी त्यामध्ये आमसुल घालून भांड्यावर झाकण ठेवून चांगल्या दोन वाफ येवू द्या. वाफ आल्यावर चवीने साखर घालून मिक्स करून घ्या.
गरम गरम महाराष्ट्रियन पारंपारिक खमंग दाल ढोकळी वरणफळ चकोल्या साजूक तूप घालून पापड व लोणच्या बरोबर सर्व्ह करा.
The Recipe of this Video can be seen here : Maharashtrian Typical Dal Dhokli Varan Fal Chakolya