टेस्टी स्पाइसी राजस्थानी बेसन भेंडी फ्राय रेसिपी
भेंडी ही अशी भाजी आहे की ती सर्वांना आवडते. लहान मुले भेंडीची भाजी आवडीने खातात. ह्या आगोदर आपण भेंडी फ्राय, मसाला भेंडी कशी बनवायची ते पाहिले. आता आपण राजस्थानी पद्धतीने बेसन वाली टेस्टी भेंडीची भाजी कशी बनवायची ते आपण बघू या.
भेंडीच्या भाजी मध्ये प्रोटीन, कैल्शियम, मैग्नीशियम, फॉस्फरस,गंधक, सोडियम, विटामीन “A” व “C” आहे.
बेसन भेंडी भाजी बनवायला अगदी सोपी आहे व झटपट होणारी आहे. अश्या प्रकारची भाजी बनवतांना तेलामद्धे मसाला व बेसन भाजून मग त्यामध्ये भेंडी घालून फ्राय केली आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
250 ग्राम कोवळी भेंडी
2 टे स्पून बेसन (किंवा 1/4 कप बेसन)
2 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
2 हिरव्या मिरच्या
1 टी स्पून बडीशेप (जाडसर कुटून)
1/4 टी स्पून हळद
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1/2 टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
1/4 कप कोथबिर (चिरून)
कृती:
प्रथम भेंडी धुवून पुसून त्याचे देठ काढून उभी चीरून घ्या. जर भेंडी खूप मोठी असेल तर त्याचे दोन भाग करून मग उभी चेरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या. कोथबिर चीरून घ्या.
एका कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, हिंग, हिरवी मिरची घालून मग त्यामध्ये बेसन घाला व बेसन चांगले खमंग होईपर्यन्त भाजून घ्या.
बेसन भाजून झाल्यावर त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, गरम मसाला, मीठ घालून थोडेसे परतून मग चिरलेली भेंडी घालून चांगली मिक्स करा.
कढईवर झाकण ठेवून मंद विस्तवावर भेंडी 6-7 मिनिट शिजवून घ्या. मधून मधून हलवत रहा. भेंडी शिजल्यावर झाकण काढून 2 मिनिट तशीच विस्तवावर ठेवा.
बेसन वाली भेंडी शिजवल्यावर कोथबिरने सजवून गरम गरम भेंडी चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.
The video in Marathi of this Rajasthani Bhindi Fry recipe can be seen here – Tasty Rajasthani Besan Bhindi Fry