हेल्दी दुधी भोपळ्याचा टेस्टी कुरकुरीत नाश्ता मुलांसाठी रेसिपी
दुधी भोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. दुधीमध्ये दुधासारखे पोषक गुण आहेत. दुधी भोपळा आपल्याला वर्षभर बाजारात मिळतो. दुधी हा पचण्यास जड आहे पण आजारी माणसाला किंवा अशक्त माणसाला दुधी मुदाम सेवन करायला देतात. दुधी नेहमी कोवळा, ताजा खवा तो जास्त गुणकारी असतो. उष्ण प्रकृतीच्या लोकांनी दुधी सेवन केल्यास त्यांची प्रकृती थंड राहते.
दुधी भोपळ्या पासून आपण भजी, हलवा, कोफ्ते बनवतो. आता आपण दुधी पासून अगदी नवीन पदार्थ बाणवणार आहोत. दुधी पासून आपण नाश्तासाठी एक अनोखा पदार्थ बनवणार आहतो. तो पदार्थ मुले अगदी आवडीने खातील.
बनवण्यासाठी वेळ: 40 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1 कप दुधी भोपळा (किसलेला)
1 कप बेसन
1/2 कप बारीक रवा
1 टे स्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून लिंबूरस
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
मीठ चवीने
तेल शाल फ्राय करण्यासाठी
कृती:
प्रथम दुधी धुवून सोलून किसून घ्या. आले-लसूण-हिरवी मिरची वाटून घ्या. कोथबिर धुवून चिरून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये किसलेला दुधी, बेसन, बारीक रवा, आले-लसूण हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, चाट मसाला,मीठ, कोथबिर घालून मिक्स करून घ्या. मग लागेल तसे पाणी वापरुन भाज्या प्रमाणे पीठ भिजवून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग घालून मिक्स केलेले बेसन घालून घट्ट होई पर्यन्त शिजवून घ्या.
मग एका स्टीलच्या ट्रेला तेल लावून त्यामध्ये मिश्रण काढून घेवून एक सारखे करून घ्या. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून थोडे तेल घालून त्यावर दुधीच्या वड्या ठेवा बाजूनी थोडे तेल सोडून दोन्ही बाजूंनी चांगल्या शालो फ्राय करून घ्या.
गरम गरम दुधीच्या वड्या टोमॅटो सॉस किवा चटणी बरोबर सर्व्ह करा.
The Video of this Recipe can be seen here: Tasty Crispy Healthy Dudhi Bhopla Nasta For Kids